विकास आराखडा तयार करा, निधी कमी पडल्यास निधी आणायची जबाबदारी माझी – आशुतोष काळे

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्याच्या सर्वागीण विकासासाठी ग्रामसेवकांनी संबंधीत विभागाशी संपर्क साधून विकास कामांचा आराखडा तयार करावा. तालुक्यातील कोणतेही विकास कामे निधी अभावी रखडू देवू नका. निधी कमी पडत असल्यास जिल्हा परिषद व शासनाकडून तात्काळ निधी आणायची जबाबदरी माझी असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. जिल्हा परिषद चांदेकसारे गटाच्या प्रभाग समितीची सभा नुकतीच सभापती अनुसया होन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. आशुतोष काळे पुढे म्हणाले की, उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. कोपरगाव तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी पाणी टंचाई आहे त्या त्या गावातील ग्रामविकास अधिका-यांनी तातडीने पाण्याच्या टँकरचे प्रस्ताव पाठवावेत. शिक्षण,आरोग्य, कृषी, बांधकाम व महिला बालकल्याण विभागाच्या अधिका-यांनी आपापसात समन्वय ठेवून विकास कामांचा पाठपुरावा करावा. त्यामुळे जनतेच्या समस्या तातडीने सुटून विकास कामांना गती मिळनार आहे. प्रत्येक अधिका-यांनी मिटिंग घेवून कामाची जबाबदारी निश्चित करावी. घरकुल, दलितवस्ती सुधार योजना, लसीकरण मोहीम नळ पाणी योजना मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करा. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य अतिशय अभ्यासू असून अधिका-यांची उडवाउडवीची उत्तरे खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड इशारा दिला. जिल्हा परिषद चांदेकसारे गटाच्या सदस्या सौ. सोनाली रोहमारे म्हणाल्या की, अधिका-यांनी प्रत्येक कामाचे महत्त्व जाणून प्राधान्याने विकास कामांचे प्रस्ताव तयार करून विकास कामे मार्गी लावा. तयार केलेल्या विकास कामांच्या प्रस्तावाची मला माहिती द्या. त्यामुळे विकास कामांचा पाठपुरावा करणे सोपे होत असल्याचे सांगितले. या प्रसंगी पंचायत समिती सभापती अनुसया होन, जि.प. सदस्या सौ. सोनाली रोहमारे प.स. सदस्य बाळासाहेब राहाणे, राहुल रोहमारे, रोहिदास होन, प्रशांत वाबळे, बाबुराव थोरात, सचिन आव्हाड, ज्ञानेश्वर गव्हाणे, गंगाधर खोमणे, वसंतराव पाचोरे, विठ्ठल जावळे, अशोक डांगे, के.डी.खालकर, सोपानराव आभाळे, योगीराज देशमुख, योगेश खालकर, मधुकर औताडे, राजेंद्र औताडे, पंकज पुंगळ, मतीन शेख, पंचायत समितीचे अधिकारी गोंदके, वागिरे, माळी, शबाना शेख, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, पशुसंवर्धन, बांधकाम व शिक्षण विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram