काळे एज्युकेशन सोसायटीची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीची ४६ वी वार्षिक सर्व साधारण सभा नुकतीच संस्थेचे विश्वस्त युवा नेते आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली गौतम पब्लिक च्या ग्रंथालयात संपन्न झाली. सर्वप्रथम या एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक स्व.शंकररावजी काळे साहेब आणि स्व.सौ.सुशीलामाई काळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आयोजित सभेसाठी अध्यक्षपदाची सुचना भास्करराव आवारे यांनी मांडली सदर सूचनेस बाळासाहेब बारहाते यांनी अनुमोदन दिले. संस्थचे सभासद एम.टी.रोहमारे यांनी दिवंगत झालेले सभासद मान्यवर, हितचिंतक, कर्मचारी यांच्या श्रद्धांजलीचा ठराव मांडण्यात आला त्यानुसार सर्व उपस्थितांनी श्रद्धान्जली अर्पण केली. विषय पत्रिकेप्रमाणे सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आणि संस्थेचे विश्वस्त युवा नेते आशुतोष काळे म्हणाले की,या संस्थेचे संस्थापक माजी खासदार स्व.शंकररावजी काळे साहेब यांनी दूरदृष्टीकोन ठेवून ४७ वर्षापूर्वी ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना आणि शेतक-यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने ही संस्था सुरु केली. या संस्थेमधून विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचे काम अविरतपणे सुरु आहे. गौतम पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेला येत्या काही वर्षात ५० वर्ष पूर्ण करीतया सुवर्ण महोत्सवाकडे यशस्वीपणे वाटचाल करीत असतांना सध्याच्या युगात अँग्रीकल्चर व फार्मसी या क्षेत्रात नौक-या मिळत असल्यामुळे भविष्यात अँग्रीकल्चर व फार्मसीचे शिक्षण सुरु करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला.संस्थेच्या इतर शाळा या महत्वाचे योगदान देत असून या शाळा आणि महाविद्यालयांचा दर्जा हा शहरातील कोणत्याही महाविद्यालया पेक्षा कमी नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड, सचिव सौ. चैतालीताई काळे, कारभारी जाधव कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक बाळासाहेब बाराहाते, विश्वस्त कारभारी जाधव, सिकंदर पटेल, भास्करराव आवारे, चांगदेव आगवन, अक्षय काळे, सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक व सभासद, मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेचे सूत्रसंचालन केशव दळवी यांनी केले तर आभार सिकंदर पटेल यांनी मानले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram