भगवान महाविरांच्या पालखीचे सौ. पुष्पाताई काळे यांच्या हस्ते पूजन

कोपरगाव शहरात मोठया भक्तीपूर्ण उत्साहात भगवान महावीरांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सजविलेल्या पालखीतून भगवान महावीरांची सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये जय महावीर, जय महावीर च्या घोषणेने संपूर्ण कोपरगाव शहर भक्तीमय वातावरणात न्हावून निघाले. यावेळी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांनी भगवान महाविरांच्या प्रतिमेचे व पालखीचे विधिवत पूजन करून जैन बांधवांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोपरगाव नगरपरिषदेचे नगरसेवक मंदार पहाडे, विरेन बोरावके, सुनील शिलेदार, हिरामण गंगूले, जैन समाजाचे पंच संतोष गंगवाल, चंद्रकांत कासलीवाल, तुषार बागरेचा,अजीतभाऊ लोहाडे, दिलीपभाऊ अजमेरे तसेच सर्व समाजाचे ट्रस्टी व जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram