लाटेवर निवडून आल्यानंतर दमछाक होणारच – आशुतोष काळे

माजी आमदार अशोकदादा काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात विरोधी पक्षाचे आमदार असतांनाही कोपरगाव तालुक्याच्या सर्वागीण विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला. कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीवर पूल व कोपरगाव शहरातील शासकीय इमारती त्या विकास कामांची आजही साक्ष देत आहेत. माजी आमदार अशोकदादा काळे यांनी केलेल्या विकास कामांची बरोबरी तालुक्याच्या लोकप्रतिनिधीच्या अल्पशा कामांबरोबर कधीही होऊ शकणार नाही. विरोधी पक्षाचे आमदार असूनही अशोकदादांची निधी आणतांना कधीही दमछाक झाली नाही परंतु गल्ली पासून दिल्ली पर्यंत तालुक्याच्या लोकप्रतिनिधींच्या पक्षाचे सरकार असूनही केवळ लाटेवर निवडून आल्यानंतर निधी आणतांना दमछाक होणारच असा टोला कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्याच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांना लगावला आहे. कोपरगाव तालुक्यातील रवंदे ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून विविध विकास कामांचा शुभारंभ युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन बाळासाहेब कदम होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते यांनी युवा नेते आशुतोष काळे व जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी कोपरगाव तालुक्याच्या विकासासाठी एकत्र येणे ही काळाची गरज होती. तालुक्याच्या जनतेच्या दृष्टीने ही अतिशय आनंदाची गोष्ट असल्याचे सांगितले. हा धागा पकडत जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी कोपरगाव तालुक्याच्या विकासासाठी आपण सदैव युवा नेते आशुतोष काळे यांच्या सोबतच असल्याचे सांगितले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, सुधाकर दंडवते, सौ. सोनालीताई रोहमारे, कारभारी आगवन, पंचायत समितीच्या सभापती सौ. अनुसयाताई होन, उपसभापती अनिल कदम, गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे, सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने, राहुल रोहमारे , प्रसाद साबळे, रोहिदास होन, प्रशांत वाबळे, राहुल जगधने, सरपंच सौ. कविता सोनवणे, उपसरपंच सौ. कावेरी कंक्राळे, सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी आहिरे, पोलीस पाटील विलास मोरे, संजय कदम, विश्वनाथ भुसे, सुकदेव घायतडकर, सुरेश कंक्राळे, बापू सोनवणे, संजय काळे, रामदास दवंगे, पोपट धुळे, शंकरशेठ नागरे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसभापति अनिल कदम यांनी केले. सूत्रसंचालन विश्वनाथ भुसे यांनी केले तर आभार जयकुमार सोनवणे यांनी मानले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram