ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे कार्य कौतुकास्पद – सौ. चैतालीताई काळे

जेष्ठ नागरिक सेवा मंचने समाजातील गरजू व्यक्तींच्या सेवेसाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. त्या माध्यमातून त्यांनी कोपरगाव शहर व तालुक्यातील जेष्ठ नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे त्यांचा वृद्धापकाळ सुखावह राहावा यासाठी विविध आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते. कोपरगाव शहरातील जेष्ठ नागरिक समाजकार्याच्या बाबतीत खूपच कार्यशील आहेत. आजही गुडघेदुखीच्या रुग्णांसाठी तपासणी शिबीराचे आयोजन करून त्यांनी समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे कार्य खरोखर कौतुकास्पद असून त्यांच्या या कार्यामुळे निश्चितपणे युवा वर्गाला समाज कार्याची प्रेरणा मिळेल असा दृढ विश्वास जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी व्यक्त केला. शिक्षणमहर्षी माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त कोपरगाव ज्येष्ठ नागरिक सेवा मंच व महिला समिती, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ कोपरगाव तसेच शालबी हॉस्पिटल अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने व्यापारी धर्मशाळा कोपरगाव येथे गुडघेदुखीच्या रुग्णांसाठी तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी सौ. चैतालीताई काळे बोलत होत्या. यावेळी गुडघ्यांचे आजार, त्यावर घेतली जाणारी काळजी व गुडघेरोपण याबद्दल प्रसिद्ध गुडघेरोग तज्ञ डॉ. भरत गजर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. गुडघेदुखी असलेल्या रुग्णांची नामवंत डॉक्टर डॉ. जपेश पाटील, डॉ. जफर साटविकर, डॉ. धनंजय परब, डॉ. रमेश वर्मा यांनी रुग्णांची तपासणी केली. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे कार्याध्यक्ष विजय बंब म्हणाले की, जेष्ठ नागरिक मंच ची स्थापना ही कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी केली असून साहेबांनी ज्येष्ठ नागरिक सेवा मंचला वेळोवेळी बहुमोल मदत केली आहे. त्याचप्रमाणे माजी आमदार अशोकराव काळे हेही जेष्ठांच्या मदतीला नेहमी धावून येत असे आणि आज युवा नेते आशुतोष काळे यांच्या रूपाने त्यांची तिसरी पिढी जेष्ठ नागरीकांसाठी पुढे आली आहे. ही कोपरगाव तालुक्याच्या जेष्ठ नागरिकांच्या दृष्टीने खूप समाधानाची गोष्ट आहे. काळे कुटुंब नेहमीच जेष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुढाकार घेत आहे. नामवंत डॉक्टर ही कर्मवीर काळे साहेबांच्या सामाजिक कार्याला आपल्या सेवेची साथ मिळावी यासाठी आवर्जून उपस्थित राहतात त्यामुळे गरजू रुग्णांना लाभ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, जी.प. सदस्य राजेश परजणे, डॉ. नाईकवाडे, डॉ. उंबरकर, ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे विजय बंब, छोटुभाई जोबनपुत्रा, दत्तात्रय कंगले, अमरनाथ लोंगाणी, उत्तमभाई शहा, चंद्रकांतशेठ ठोळे, सुधाभाभी ठोळे, डॉ. अजमेरे, डॉ. विजय कोठारी, रजनीताई गुजराथी, राजेंद्र शिंगी, वसंतराव आव्हाड, सुधाकर कुलकर्णी, बालचंद्र लकारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे, सौ. प्रतिभा शिलेदार, सौ. वर्षा कहार तसेच सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram