कर्मवीर शंकरराव काळे ध्येयवादी, व्रतस्थ व्यक्तिमत्व – सुनील महाराज लांजुळकर

समाजाच्या उत्कर्ष साधायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हा विचार डोळ्यासमोर ठेवून आपले संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी वाहून घेणारे माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब ध्येयवादी, व्रतस्थ व्यक्तिमत्व असल्याचे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आश्रम गुरुकुंज, अमरवाती येथील राष्ट्रीय प्रबोधनकार श्री सुनील महाराज लांजुळकर यांनी प्रबोधनपर खंजिरी कीर्तनरुपी सेवेत पोहेगाव येथे प्रथम पुष्प गुंफताना सांगितले. शिक्षणमहर्षी, माजी खासदार, कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या ९७ व्या जयंतिनिमित्त प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या धार्मिक व सामाजिक विचारातून कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव, चांदेकसारे, बहादराबाद, वेस-सोयेगाव, रांजणगाव देशमुख, मल्हारवाडी आदी ठिकाणी मंगळवार दिनांक १०/४/२०१८ ते रविवार दिनांक १५/४/२०१८ पर्यंत नियमितपणे राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज आश्रमाचे राष्ट्रीय प्रबोधनकार श्री सुनीलमहाराज लांजुळकर यांच्या रसाळ वाणीतून प्रबोधनपर खंजिरी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ समाज उपयोगी कार्यक्रम नेहमीच आयोजित करीत आले आहे. समाजात महिलांना मानाचे स्थान मिळावे. आजचा युवक व्यसनापासून दूर राहावा समाजामध्ये जागृती व्हावी यासाठी अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांनी आपल्या मनोगतात यावेळी सांगितले. या कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनकार श्री सुनीलमहाराज लांजुळकर यांनी सामाजिक विषमता अज्ञानामुळे निर्माण होत असून मनुष्याच्या जन्मापासून त्यांच्या मृत्यू पर्यंत जन्माला येणा-या प्रत्येक व्यक्तीवर सोळा संस्कार केले जातात याची माहिती दिली. गरोदर स्त्रियांनी टी.व्ही. पाहू नये टी.व्ही चे संस्कार जन्माला येणा-या बाळावर होतात. व्यसन करू नका व्यसनाने संसार उध्वस्त होत असल्याचे सांगितले. याप्रसंगी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे, सभापती सौ. अनुसया होन, कर्मवीर काळे कारखान्याचे माजी व्हा,चेअरमन सचिन रोहमारे, संचालक सुनील शिंदे, एम. टी. रोहमारे, राहुल रोहमारे, संजय रोहमारे,राजेंद्र औताडे, नंदकिशोर औताडे, केशव जावळे, चंद्रकांत औताडे, आदी मान्यवरांसह पोहेगाव ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram