डॉ. बाबासाहेब आंबेडकर विश्वाला मिळालेली अनमोल देणगी - आशुतोष काळे

आपल्या भारत देशाच्या पवित्र भूमीने अनेक महापुरुषांना जन्म दिला आहे. या महापुरुषांनी देशाच्या अखंडतेसाठी व एकतेसाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा प्राणपणाने जोपासली. त्यांच्या सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहे. अशा थोर महापुरुषांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव अग्रभागी आहे. देशहितासाठी सर्वच क्षेत्रात त्यांनी अजोड कामगिरी बजावली आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा सर्व समाजाने घ्यावी. संपूर्ण विश्वाचे महामानव असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेताच नवचेतना निर्माण होत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण विश्वाला मिळालेली अनमोल देणगी आहे असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित कोपरगाव येथे ते बोलत होते. युवा नेते आशुतोष काळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी, विजयराव आढाव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, संदीप पगारे, मंदार पहाडे, सुनिल शिलेदार, सुनील मोकळ, नवाज कुरेशी, संतोष चवंडके, इम्तियाज अत्तार, गौतम बनसोडे, बाळासाहेब रुईकर, राजेंद्र आभाळे, फकीरमामू कुरेशी, दिनकर खरे, प्रसाद आढाव, नितीन बनसोडे, मनोज कडू, निखील डांगे, प्रसाद साबळे, नामदेव मोरे, गोरख पंडोरे, राहुल देवळालीकर, प्रकाश दुशिंग, संदीप सावतडकर,बापू वढने, वाल्मिक लाहीरे, अंबादास वडांगळे, हिरामण कहार, सचिन बढे, धनंजय कहार, सुरज बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram