कर्मवीर काळे कारखाना कार्यस्थळावर सौ.चैताली काळे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्यात माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या पुढाकारातून कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर सर्वप्रथम उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी त्यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येवून सामुदायिक बुध्दवंदना घेण्यात आली. सुरेगाव, कोळपेवाडी, कोळगाव थडी या मार्गावर समता रथ व रॅली काढण्यात आली. या समता रथामध्ये सर्वधर्मिय धर्मगुरूंच्या वेशभूषा परिधान करून समतेचा संदेश देण्यात आला. या समता रथाचे सौ. चैतालीताई काळे यांनी कौतुक केले. यावेळी कारखाना कार्यालय येथे डॉ. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सूर्यभान कोळपे, कार्यकारी संचालक गिरीश जगताप, जनरल मॅनेजर ए. व्ही. काळे, सेक्रेटरी सुनील कोल्हे, ऑफिस सुपरिटेडेंट बी.बी.सय्यद, पदाधिकारी, संचालक राजेंद्र मेहेरखांब ,सुरेगाव चे सरपंच वाल्मिक आप्पा कोळपे, ग्रामविकास अधिकारी एन. डी. खेडकर, प.स. सदस्या सौ. पौर्णिमा जगधणे, राहुल जगधने, सिद्धार्थ मेहेरखांब, मोतीराम निकम, रविंद्र देवकर,अंबादास धनगर, विष्णु सोनवणे,दादासाहेब जगताप,अरुण लोंढे, राहुल बनकर ,रविंद्र डोलारे, यशवंत निकम ,प्रमोद जगताप, रमेश निकम ,राजेंद्र मेहेरखांब, शांताराम रणशुर परसराम मेहेरखांब, शांताराम मेहेरखांब,अंबादास मेहेरखांब, बाळासाहेब मेहेरखांब, मोहनराव गायकवाड, शामराव मेहेरखांब आकाश निकम, सोमनाथ निकम तसेच सुरेगाव, कोळगाव थडी, कोळपेवाडी व वेळापूर परिसरातील धर्म बंधूभगिनी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram