विस्कळीत आवर्तनाचा आशुतोष काळेंनी विचारला जाब | पाटबंधारे खात्याच्या अधिका-यांना सुनावले खडेबोल

मागील तीन आठवड्यापासून गोदावरी कालव्यांना उन्हाळी आवर्तन सोडण्यात आलेले आहे. उन्हाची तीव्रता वाढली असून शेतातील चारापिके व फळबागा जळून पाण्या अभावी जळून चालल्या आहेत. तरीही पाटबंधारे खात्याचे अधिकारी चा-या सोडायला तयार नाहींत अशा आशयाच्या तक्रारी शेतक-यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांच्याकडे केल्या होत्या. त्या तक्रारीची दखल घेवून आशुतोष काळे कोपरगाव व राहाता तालुक्यातील शेतक-यांसह पाटबंधारे कार्यालयावर जावून धडकले व गोदावरी उजवा तट कालवा राहाता उपविभागाचे उपाभियंता कासम गोटूवार यांना जाब विचारून खडे बोल सुनावले. आवर्तनाची घोषणा तुम्हीच करता मग अंमलबजावणी का करीत नाही. शेतकरी पाटबंधारे विभागाच्या निर्णयानुसारच नियोजन करतात. गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील खालच्या भागातील शेतकरी म्हणतात वर पाणी चालू आहे आणि वरच्या भागातील शेतकरी म्हणतात खाली पाणी चालू आहे. प्रत्यक्षात मात्र वरच्या आणि खालच्या शेतक-यांना पाणी मिळाले नाही मग हे पाणी गेले कुठे असा प्रश्न युवा नेते आशुतोष काळे यांनी गोदावरी उजवा तट कालवा राहाता उपविभागाचे उपाभियंता कासम गोटूवार यांना विचारला या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर उपाभियंता कासम गोटूवार यांच्याकडून मिळाले नाही. त्यावेळी आशुतोष काळेंनी पाटबंधारे खात्याच्या अधिका-यांना धारेवर धरले. पाटबंधारे खात्याचे अधिकारी एका शेतक-याचे सोळा एकर शेतीला पाणी देता पण त्या शेतक-याच्या शेजारील शेतक-याच्या तीन एकर शेतीसाठी पाणी देत नाही हा शेतक-यांवर अन्याय आहे. आवर्तनाचे सर्वच नियोजन कोलमडले आहे त्यामुळे शेतकरी उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहे. कारणे सांगू नका पाणी मागणी अर्ज दाखल केलेला एकही शेतकरी आवर्तनापासून वंचित राहता कामा नये. आवर्तनाचा लाभ हा सर्व शेतक-यांना समान पद्धतीने मिळालाच पाहिजे. जर शेतक-यांवर अन्याय होणार असाल तर होणा-या परिणामांना तयार रहा असा सज्जड ईशाराच युवा नेते आशुतोष काळे यांनी पाटबंधारे खात्याच्या अधिका-यांना यावेळी दिला.रब्बीच्या आवर्तनात जे पाणी वाचले आहे ते पाणी या उन्हाळी आवर्तनात द्या. सर्व शेतक-यांचे भरणे झाल्याशिवाय आवर्तन बंद करू नका अशा सुचना केल्या. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन राजेंद्र गिरमे, सचिन रोहमारे, संचालक सुनील शिंदे, नंदकुमार सदाफळ, बाबासाहेब कोते, अण्णासाहेब कोते, प्रमोद चौधरी, मधुकर औताडे, पुणतांब्याचे माजी सरपंच मुरलीधर थोरात, दीपक वाघ, नपावाडीचे उपसरपंच राजेंद्र धनवटे, दिलीप चौधरी आदींसह कोपरगाव राहाता तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram