शेतक-यांचे भले होणार असेल तर कोणताही त्रास सहन करू – आशुतोष काळे

देर्डे को-हाळे व तालुक्यातील इतर १० गावामधून समृद्धी महामार्ग जाणार याची माहिती सर्वप्रथम मी शेतक-यांना दिली. आपल्या बागायती जमीन, विहिरी, घरे, जनावरांचे गोठे जाणार या धास्तीने शेतकरी हवालदिल झाले विचार करून करून या बाधित शेतक-यांना बी.पी. चे आजार जडले. एका बाधित शेतक-याला तर आपला जीवही गमवावा लागला. शेतक-यांना काय करावे, कुठे जावे सुचेनासे झाले. त्यावेळी या बाधित शेतक-यांच्या मागे मी खंबीरपने उभा राहिलो. या बाधित शेतक-यांसाठी शासनाशी कायदेशीर व रस्त्यावरची लढाई लढलो.त्यामुळे या शेतक-यांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळून या बाधित शेतक-यांना कोट्यावधी रुपये मिळवून दिले. शासनाशी कायदेशीर व रस्त्यावरची लढाई लढतांना मला त्रासही झाला व होतही आहे पण शेतक-यांचे भले होणार असेल तर आपण कोणताही त्रास सहन करू असा विश्वास कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी देर्डे को-हाळे येथे विविध विकासकामांचा शुभारंभ करतांना उपस्थितांना दिला. कोपरगाव तालुक्याच्या जनतेने ज्यांच्यावर एवढा मोठा विश्वास टाकला त्या विश्वासला पायदळी तुडवत शेतकरी संकटात असत्तांना ज्यांनी आधार द्यायचा त्यांनी शेतक-यांचा हात केव्हाच सोडला असा टोला असे युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्याच्या लोकप्रतिनिधी सौ स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता यावेळी लगावला. कोपरगाव तालुक्यातील देर्डे को-हाळे ग्रामपंचायत निधीतून विविध विकासकामांचा शुभारंभ युवानेते आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी सभापती अनुसया होन होत्या. यावेळी आशुतोष काळे यांच्या हस्ते समाज मंदिर बांधकाम, देर्डे कोऱ्हाळे - पोहेगाव रोडवरील भूमिगत गटारी, विघे वस्ती रस्ता काँक्रीटीकरण, उल्हासनगर वस्ती रस्ता काँक्रीटीकरण, साईबाबा मंदिर ते पोहेगाव रोड रस्ता काँक्रीटीकरण आदी कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी, सभापती सौ.अनुसयाताई होन, राहुल रोहमारे, कचेश्वर डुबे, गौतम विघे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अध्यक्षा सभापती सौ.अनुसया होन, राहुल रोहमारे, काळे कारखान्याचे संचालक सुनील शिंदे, जिनिंग प्रेसिंगचे संचालक कचेशवर डूबे, सरपंच योगीराज देशमुख,उपसरपंच कृष्णा शिलेदार, बाबुराव कोल्हे, मोहनराव आभाळे,पाराजी होन, बाळासाहेब घुमरे, भाऊसाहेब कुऱ्हाडे, सोपानराव आभाळे, वसंतराव आभाळे,चांगदेव होन,पोपटराव गुंड,सदस्य सतिष दिघे,रविंद्र माळी, संजय विघे,सौ.लता विलास डूबे, सौ.मनीषा अनिल डूबे,सौ. पूजा सुभाष काळे,सौ.सुनीता ज्ञानदेव शिंदे, केशव विघे, गौतम विघे, उमाकांत शिलेदार, सुदाम डूबे, डॉ नरेंद्र देशमुख, शामराव शिलेदार, काशिनाथ डूबे,अर्जुन दिघे,वसंत शिंदे,शांतारामडूबे,केशव विघे, आनंदा विघे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान डूबे, प्रास्तविक सरपंच योगीराज देशमुख यांनी केले तर आभार ठेकेदार केकान यांनी मानले यावेळी देर्डे कोऱ्हाळे चे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram