आशुतोष काळेंच्या हस्ते उपसभापती राजेंद्र निकोलेंचा सत्कार

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी राजेंद्र निकोले यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली असून त्यांचा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी निवड करून काम करण्याची संधी दिली त्याबद्दल राजेंद्र निकोले यांनी माजी आमदार अशोकराव काळे, युवा नेते आशुतोष काळे यांचे आभार मानले. आपल्यावर टाकलेली जबाबदारी युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडू असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. यावेळी गौतम बँकेचे माजी संचालक दिलीपराव गायकवाड, जिनिंग प्रेसिंगचे संचालक गणेश गायकवाड, संजय निर्मळ, प्रमोद कोल्हे, भाऊसाहेब आहेर, माणिक तेलंगे, गोरक्षनाथ म्हस्के, अशोक घोलप, गोरख क्षिरसागर आदी मान्यवर उपस्थित होते

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram