गौतम पब्लिक स्कूलच्या निवृत्त कर्मचा-यांना निरोप

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूलचे कर्मचारी विठ्ठल महाले व नानासाहेब डोखे हे दोन कर्मचारी आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकतेच सेवा निवृत्त झाले असून त्यांचा संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे याच्या हस्ते यथोचित सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला. याप्रसंगी बोलतांना सौ. चैतालीताई काळे म्हणाल्या की, शिक्षण महर्षी माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांनी सहकारी साखर कारखानदारीचा डोलारा उभारून ग्रामीण भागातील शेतक-यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे या उद्देशातून गौतम एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून गौतम पब्लिक स्कूल निवासी शाळेची स्थापना केली. या संस्थेचा आज मोठा वटवृक्ष झाला असून संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयातून दर्जेदार शिक्षण मिळत असल्यामुळे संस्था नावारूपाला आली आहे. ही संस्था नावारूपाला येण्यामागे संस्थेत काम करीत असलेल्या प्रत्येक घटकाचे मोलाचे योगदान असल्याचे यावेळी सौ.चैतालीताई काळे यांनी सांगितले. यावेळी शहाजापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य त्रिंबक वर्पे यांचा सौ. चैतालीताई काळे यांनी सत्कार केला. या कार्यक्रमात शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या मातोश्री सुगराबी शेख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लुकेश पंडित यांनी केले तर आभार प्रकाश भुजबळ यांनी मानले. यावेळी संस्थेचे शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram