तरुणाईने संत गाडगे महाराज, तुकडोजी महाराजांच्या विचारांचे अनुकरण केल्यास राज्य देश, समृद्ध – आशुतोष काळे

संत गाडगे महाराजांनी समाज निरोगी व स्वच्छ राहण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. माणूस, मानवतावाद व माणुसकी आपल्या समाज कार्याचा केंद्रबिंदु ठेवून समाजातील शेवटच्या माणसाचा सर्वागीण विकास जपण्याचा मानवता धर्म जोपासला. आपल्या वैशिष्ठ्यपूर्ण शैलीतील कीर्तनातून समाजातील वाईट प्रवृत्तीवर हल्ला चढवून संत गाडगे महाराज व तुकडोजी महाराजांनी आपल्या लेखणीतून, वाणीतून व ख्नजीरीच्या निनादातून राष्ट्रभावना जोपासून समाज जागृती करत समाजाला योग्य दिशा देण्याचे काम केले. आज समाजाला अशा विचारांची गरज असून आजच्या तरुणाईने संत गाडगे महाराज, तुकडोजी महाराजांच्या विचारांचे अनुकरण केल्यास आपले राज्य, आपला देश ख-या अर्थाने समृद्ध होईल असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी वाकडी येथे केले. प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या धार्मिक व सामाजिक विचारातून कर्मवीर शंकररावजी काळे साहेब स्मृती प्रित्यर्थ राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज प्रणीत प्रबोधनपर राष्ट्रीय खंजिरी कीर्तन सोहळा राहाता तालुक्यातील वाकडी, पुणतांबा, चितळी, शिंगवे, आदी ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आश्रम गुरुकुंज, अमरावती येथील राष्ट्रीय कीर्तनकार विनोद सम्राट ह.भ.प. नारायणदास पडोळे महाराज यांच्या प्रबोधनपर खंजिरी कीर्तनरुपी सेवेचे पहिले पुष्प वाकडी येथे गुंफण्यात आले. या कार्यक्रमात युवा नेते आशुतोष काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ह.भ.प. नारायणदास पडोळे महाराजांनी आपल्या रसाळ वाणीतून भाविकांना उपदेश करतांना महिलांनी उपास, व्रतवैकल्य आवश्य करावे पण त्याच बरोबर आपल्या कुटुंबार चांगले संस्कार कसे होतील याचीही काळजी घेतली पाहिजे. आजचे तरून हे या देशाचे उद्याचे भविष्य आहे, त्यासाठी तरुणाईने व्यसनापासून नेहमी दूर राहिले पाहिजे असा महत्वपूर्ण उपदेश दिला. या कार्यक्रमासाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे, युवा नेते आशुतोष काळे, गौतम सहकारी बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, जी.प. सदस्या सौ. कविता लहारे, पंडीतराव लहारे, राजेंद्र लहारे, सौ. अर्चना आहेर, संपतराव शेळके, अमित आहेर, त्रिंबक लहारे, मुरलीधर शेळके, अनिलराव कोते, सुरेश लहारे, कल्याणराव सदाफळ, आण्णासाहेब कोते, जालिंदर कोते, शंकरराव लहारे, भिमाशंकर लोखंडे, विठ्ठलराव शेळके, अनिल रकटे, अंजाबापू रकटे, प्रभाकर येलम, अशोक लभडे, कारभारी भोंडे, शेखर लहारे, बापूसाहेब लहारे आदी मान्यवरांसह वाकडी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram