इफ्तार पार्टीतून सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन – आशुतोष काळे

पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधव मोठ्या धार्मिक भावनेतून अतिशय खडतर उपवास करतात. इफ्तार पार्टीसाठी हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येतात. हिंदू बांधवही मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टीच्या वेळी आलिंगन देऊन शुभेच्छा देतात त्यामुळे मुस्लिम बांधवांचा आनंद द्विगुणित तर होतोच पण या इफ्तार पार्टीतून सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडत असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे केले. चांदेकसारे येथे मुस्लीम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना युवा नेते आशुतोष काळे पुढे म्हणाले की, आपली संस्कृती अतिशय महान असून सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र येवून सण उत्सव साजरे करतात एकमेकांच्या सुख दुख:त सहभागी होतात ही खरी आपल्या देशाच्या विविधतेमध्ये असलेली एकात्मतेची खरी शक्ती आहे. आपला देश महासत्ता होण्यासाठी अशाच एकोप्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावर्षी हवामान खात्याने चांगले पर्जन्यमान होणार असल्याचा अंदाज वर्तवविला असून अल्लाहने हवामान खात्याचा अंदाज १०० टक्के खरा करून चांगला पाऊस पाडावा व अडचणीत असलेल्या बळीराजावर आपली कृपादृष्टी करावी अशी पार्थना युवानेते आशुतोष काळे यांनी मुस्लीम बांधवा सोबत यावेळी केली. याप्रसंगी मोहम्मद शेख, ईब्राहिमभाई शेख, सय्यद बाबा, भैय्यासाहेब सय्यद, अहमदभाई शेख, रोहिदास होन, आनंदराव चव्हान, संजय होन, भीमाजी होन, पाराजी, होन, नूरमोहम्मद शेख, दादासाहेब होन,मोहन पवार, बशीर शेख, फारूक शेख, हसन शेख, फिरोज शेख, डॉ. आसिफ शेख, डॉ. गोरक्षनाथ रोकडे, मतीन शेख, शंकरराव चव्हाण, वाहिदभाई शेख, युनुसभाई शेख, तुलसीदास होन, चांदेकसारे व पंचक्रोशितील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram