पार्थ पवार यांची कर्मवीर काळे कारखाना उद्योग समूहाला सदिच्छा भेट

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जेष्ठ चिरंजीव पार्थ पवार यांनी नुकतीच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाला नुकतीच सदिच्छा भेट दिली. शनिवार दिनांक ९/६/२०१८ रोजी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जेष्ठ चिरंजीव पार्थ पवार यांनी कर्मवीर काळे कारखाना उद्योग समूहाला सदिच्छा भेट दिली. तत्पूर्वी सकाळी युवा नेते आशुतोष काळे व पार्थ पवार यांनी शिर्डी येथे जावून श्री. साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. कारखाना कार्यस्थळावर कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी त्यांचे स्वागत केले. पार्थ पवार यांनी कर्मवीर शंकररावजी काळे स्मृती उद्यानाला भेट देवून माजी खासदार शिक्षण महर्षि कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांच्या शिक्षण, सहकार व सामाजिक कार्य स्मृती उद्यानाच्या माध्यमातून जवळून अनुभवले. युवा नेते आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून स्मृती उद्यानामध्ये मांडण्यात आलेला कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांचा जीवनपट अतिशय समर्पकपणे मांडला असून यावरून कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांचे समाजासाठी सर्वच क्षेत्रात दिलेले योगदान किती महान होते याची जाणीव होत असल्याचे पार्थ पवार म्हणाले. कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांचे कार्य आजपर्यंत खूप ऐकून होतो परंतु आज त्यांच्या स्मृती स्थळाला प्रत्यक्ष भेट दिल्यांनतर त्यांचे सामाजिक कार्य समक्षपणे पाहिल्याची अनुभूती येत असल्याचे यांनी सांगितले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram