सर्व धर्माचा आदर करण्याची आपली संस्कृती | खडतर उपवास व कुराण पठण परमेश्वराला आपलेसे करण्याचा मार्ग – आशुतोष काळे

आपली भारतीय संस्कृती संपूर्ण विश्वात महान आहे. सर्व धर्माचा आदर करावा अशी आपल्या संस्कृतीची शिकवण असून त्यामुळे आपल्या देशात अनेक जाती धर्माचे नागरिक गुण्या-गोविंदाने राहत आहे. मुस्लीम बांधवही आपल्या धर्माची परंपरा शिकवण जोपासत असतांना सर्व जाती धर्माचा आदर करतात. मुस्लीम बंधू-भगिनी व वयाने आतिशय लहान असलेली बालकेही पवित्र रमजान महिन्यात ३० दिवस मोठ्या श्रद्धेने उपवास करतात. विशेष नमाजमध्ये कुराण पठन करतात. अशा प्रकारचे खडतर उपवास व कुराण पठण परमेश्वराला आपलेसे करण्याचा उत्तम मार्ग असल्याचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे आयोजित इफ्तार पार्टी कार्यक्रमात केले. कोपरगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगाव येथे पवित्र रमजान महिन्या निंमित्त मुस्लीम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, सर्व मुस्लीम बांधव मोठ्या भक्तीभावाने उपवास करतात. उपवास प्रार्थना केल्यामुळे शरीर व मन पवित्र होते. रमजान महिना आनंद व प्रेरणा देणारा असून मुस्लीम बांधव एकत्र येवून करीत असलेली प्रार्थना व इफ्तार पार्टी सामाजिक ऐक्याचा संदेश देत आहे. समता, बंधुभाव, जकात आणि सदका पाळणारा हा रमजान महिना असून हिंदू मुस्लीम बांधवांचे प्रेम, आपुलकी वाढविणारा आहे. आपल्या देशात सर्व समाजाचे बांधव एकमेकांच्या सण-उत्सवामध्ये सहभागी होतात हे आपल्या देशाच्या एकतेचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी चिमुकलीने युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते आपला रोजा सोडला. याप्रसंगी मौलाना मुख्तार,मौलाना यासीन मिल्ली, मौलाना निसार, मौलाना हाफिज बशीर रहेमान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव नगरसेवक संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, विरेन बोरावके, अजीज शेख, संदीप पगारे, सुनील शिलेदार,नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद,दिनार कुदळे, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, जिल्हा उपाध्यक्ष दीपक साळुंके, फकीरमामू कुरेशी, रशीद शेख, इम्तियाज अत्तार, चांदभाई पठान, जावेद शेख, हारुणभाई शेख, शफीक सय्यद, फिरोज पठान, आदी मान्यवरांसह मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram