काळे घराण्याचे शैक्षणिक क्षेत्रासाठी बहुमोल योगदान - सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे

आपल्या प्रत्येकाच्या घराण्याचा एक इतिहास असतो. अशा घराण्यांनी समाजासाठी खूप मोठ काम केलेलं असत असच काम युवा नेते आशुतोष काळे यांच्या घराण्याने केले असून त्यांचे आजोबा माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या प्रेरणेतून शैक्षणिक क्षेत्रात बहुमोल योगदान देवून खूप मोठ समाज कार्य केले असल्याचे गौरवदगार प्रसिद्ध सिनिअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी कोपरगाव येथे केले. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाच्या वतीने ईयत्ता १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे होत्या. यावेळी बोलतांना मकरंद अनासपुरे पुढे म्हणाले की, ज्ञान मिळविणे कोणत्या जातीची किंवा वर्गाची मक्तेदारी नाही. तो प्रत्येकाचा स्वाभाविक हक्क आहे. गुणवत्ता मिळाली म्हणजे जबाबदारी वाढली.काही माणस गुणवत्तेने खूप श्रीमंत होतात.आपल्या माणसांना,आपल्या गावाला विसरून जातात. अशा गुणवत्तेला अर्थ नाही. सोशल मिडिया दुधारी अस्त्र आहे. विज्ञा नाच मोठ दुर्देव आहे की विज्ञान जो शोध लावते ते कोणाच्या हातात जावे याच्यावर विज्ञानाचा कंट्रोल नाही याचे भान ठेवा. पापले देशप्रेम फक्त घशात असून उपयोग नाही ते कृतीत आणणे गरजेचे आहे.वाचनावर भर द्या. आपले मित्र निवडतांना काळजी घ्या.वाईट मित्रांच्या नादाला लागू नका. आयुष्यात जर तुम्हाला काही तरी चांगलं कारायचे असेल तर तुमच्याबरोबर असणारी माणस चांगली पाहिजे. आपल्या गुणवत्तेचा उपयोग परदेशात जावून नौकरी करण्यासाठी न करता आपल्या देशाच्या मातीच्या सेवेसाठी करा असे आवाहन केले. यावेळी बोलतांना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे म्हणाले की, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाच्या वतीने दरवर्षी ईयत्ता १० वी व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा आयोजित केला जातो. परंतु यावर्षी एक वेगळा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा सत्कार सोहळा केला. नाम फौंडेशनच्या माध्यमातून जेष्ठ सिनेअभिने आदरणीय नाना पाटेकरजी व आदरणीय मकरंदजी अनासपुरे आपण समाजाचं काही तरी देन लागतो या भावनेतून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आधार देण्याचे केलेले काम देशसेवेपेक्षा निश्चित कमी नाही अशा समाजासाठी आपल आयुष्य वेचणा-या मकरंदजी अनासपुरे यांच्या कौतुकाची, शाबासकीची थाप आपल्या कोपरगाव तालुक्यातील गुणवंतांच्या पाठीवर पडावी त्यांच्या प्रेरणेतून या गुणवंतांच्या हृदयात समाजसेवेचे बीज रोवले जावे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण मकरंद अनासपुरे यांना मुद्दामहून बोलावविले असल्याचे सांगितले. आपले आई वडील म्हणतात म्हणून विद्यार्थ्यांनी मनाविरुद्ध कोणतेही क्षेत्र निवडू नका. पालकांनीही आपले मत विद्यार्थ्यांवर लादू नये. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता किती आहे हे पहा त्यांचा कल कोणत्या क्षेत्राकडे हे पहा. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे असे क्षेत्र निवडा की ज्यामुळे तुम्ही घेतेलेले शिक्षण तुम्हाला तुमच्या पायावर खंबीरपणे उभे करून तुमचे भविष्य उज्वल होईल व तुमचे, तुमच्या आई वडीलांचे, तुमच्या गावाचे व आपल्या तालुक्याचे नाव मोठे होईल अशा क्षेत्राचीच निवड करा असा महत्वपूर्ण संदेश युवा नेते आशुतोष काळे यांनी उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांना दिला. याप्रसंगी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन सूर्यभान कोळपे, गौतम सहकारी बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, पंचायत समितीच्या सभापती सौ. अनुसयाताई होन, उपसभापती अनिल कदम, गोरक्षनाथ जामदार, डॉ. क्षत्रिय जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, सौ. सोनाली रोहमारे, शहर पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदिप पगारे नगरसेविका सौ. प्रतिभाताई शिलेदार, सौ. वर्षाताई कहार, नवाज कुरेशी, काळे कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, पंचायत समिती सदस्य अर्जुनराव काळे,मधुकर टेके, श्रावण आसने, चारुदत्त सिनगर, सौ. स्वप्नजा वाबळे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram