आशुतोष काळेंनी दिल्या मुस्लीम बांधवाना रमजान ईदच्या शुभेच्छा

आपला देश सर्वधर्म समभावनेची जपणूक करणारा असून विविध परंपरा व सण आपल्या देशात मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. अशाच परंपरापैकी पवित्र रमजान महिना संपल्या नंतर येणारा रमजान ईद चा सण संपूर्ण मानव जातीला प्रेम देणारा व सदभावना वाढविणारा सण असल्याचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. कोपरगाव येथील ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधवाना रमजान ईदच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लीम बांधवांनी केलेले व्रत उपासना व रमजान ईद या सणाच्या दिवशी मुस्लीम बांधवांनी शुद्ध आचरण व शुद्ध आचार व विचारातून मुस्लीम बांधवांनी मनोभावे केलेले सामुदायिक नमाज पठन अल्लाच्या चरणी अर्पण होते त्यामुळे रमजान ईद या सणाला विशेष असे महत्व असल्याचे आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले. कोपरगाव शहरात मोठ्या उत्साहामध्ये मुस्लीम बांधवांनी रमजान ईदचा सण साजरा केला. मुस्लीम बांधवांनी ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण केले. याप्रसंगी आशुतोष काळे यांनी सर्व मुस्लीम बांधवाना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या तसेच इंदिरा नगर येथील येथील नवीन मदरशामध्ये जावून मुस्लीम बांधवाना शुभेच्छा दिल्या. चिमुकल्यांनीही एकमेकांना आलिंगन देवून रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, युवक चे अध्यक्ष नवाज कुरेशी, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, सुनील शिलेदार, संदीप पगारे, अजीज शेख, हिरामण गंगुले, मेहमूद सय्यद, फकीरमामू कुरेशी, अजगर खाटीक, शफिक शेख, रशीद शेख, ईस्त्राइल शेख, डॉ. तुषार गलांडे, दिनकर खरे, रमेश गवळी, राजेंद्र आभाळे, राजेंद्र बोरावके,चंद्रशेखर म्हस्के, अॅड. मनोज कडू, इम्तियाज अत्तार, जावेद शेख, फिरोज पठाण, चांदभाई पठान, संदीप सावतडकर, राहुल देवळालिकर, संतोष टोरपे आदी मान्यवर उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram