विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत मौलिक भेट – सौ. चैतालीताई काळे

आपण जीवन जगत असतांना आपण या समाजासाठी आपली काहीतरी जबाबदारी आहे याचे जाणीव प्रत्येकाला असलीच पाहिजे. समाजात अनेक गरजू व्यक्ति आहेत. त्यांना काहीना काही गोष्टींची उणीव जरूर भासत असते. अशा उणिवा ओळखून समाजातील गरजू विद्यार्थ्यांना कर्मवीर प्रतिष्ठानने विद्यार्थ्यांची शालेय अडचण ओळखून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत मौलिक भेट असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी केले. कोपरगाव येथे केले. कोपरगाव येथे नुकतेच कर्मवीर प्रतिष्ठान कोपरगाव यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना सौ. चैतालीताई काळे यांच्या शुभहस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले याप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्यांचा हक्क आहे परंतु अनेक विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता असूनही आर्थिक अडचणीमुळे हे विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करू शकत नाही. अशा वेळी सामाजिक बांधिलकी जोपासत या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची केलेली मदत विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा आर्थिक भार कमी होण्यास नक्कीच मदत होणार आहे. अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम सातत्याने राबवविले गेले पाहिजे असे मत व्यक्त केले. याप्रसंगी कोपरगाव तालुका जिनिंग-प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, व्हाईस चेअरमन सचिन आव्हाड, जनरल मॅनेजर काशिद,कर्मवीर प्रतिष्ठानचे राजेंद्र आभाळे,राजेंद्र बोरावके, नितीन बनसोडे, हृषीकेश खैरनार, सचिन बढे, प्रसाद उदावंत, प्रदीप राय आदी मान्यवर उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram