चांदेकसारे येथील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या नागरिकांना कर्मवीर काळे उद्योग समूहातर्फे तातडीची मदत

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील आनंदवाडी परिसरात गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे १००० नागरिकांची वस्ती असलेल्या जवळपास ८०० नागरीकांना या अतिवृष्टीचा फटका बसला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून सुदैवाने जीवित हानी झाली नाही. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांची कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी भेट घेवून त्यांना धीर दिला व कारखाना उद्योग समूहाच्या वतीने सर्वोतोपरी तातडीची मदत केली. गुरुवार दिनांक २१/६/१/२०१८रोजी सायंकाळी सर्वदूर झालेल्या पावसाने कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील आनंदवाडी परिसरात दाणादाण उडवून देत जवळपास १०० च्या वर घरांचे प्रचंड नुकसान झाले. या घटनेची माहिती समजताच युवा नेते आशुतोष काळे यांनी पंचायत समितीच्या सभापती सौ. अनुसया होन, उपसभापति अनिल कदम, कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक आनंदराव चव्हाण व कार्यकर्त्यांना घटनास्थळी जावून नागरीकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सुचना करून स्वत: बाहेरगावी असतांना उद्भवलेल्या परिस्थितीवर बारीक नजर ठेवून होते. या अचानक आलेल्या पावसामुळे लहान मुलांसह सर्वांची एकच तारांबळ उडाली. नागरीकांनी कसाबसा आपला जीव वाचवला असला तरी काही २० शेळ्या पाण्यात वाहून जावून दगावल्या, शेकडो कोंबड्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या कुटुबांचे घरातील संसार उपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेले, त्याच बरोबर घरातील अन्नधान्य व सर्व कागदपत्रही यामध्ये रेशन कार्ड, आधार कार्ड, वाहून गेल्यामुळे हे सर्व नागरिक निराधार झाले. या नागरिकांना युवा नेते आशुतोष काळे यांनी भेट घेवून झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नुकसान झालेले सर्व नागरिक अतिशय गरीब कुटुंबातील असून सर्व कुटुंब मोलमजुरी करणारे आहेत. अतिवृष्टीने या नागरिकांच्या घरातील अनधान्य व भांडीकुडी वाहून गेल्याचे पाहून युवा नेते आशुतोष काळे यांनी कार्यकर्त्यांना योग्य त्या सुचना देवून तातडीने सर्वोतोपरी मदत पाठविली. या नागरिकांच्या घरांमध्ये जवळपास चार फुट पाणी साचले होते. ज्या घरांचे पत्रे उडाले आहे, अतिनुकसान झाले आहे त्या घरांची पाहणी केली. ज्या नागरिकांची घरे पावसाच्या पाण्याने खराब झाली त्या नागरिकांच्या घरांना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक बंबाने धुवून देवून त्यांचा वाचलेला संसार पुन्हा त्या नागरिकांच्या घरात ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी मदत केली. चांदेकसारेच्या ५० वर्षाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस आज पर्यंत कधीच झाला नव्हता. व एवढे नुकसानही आजपर्यंत कधीही झाले नाही असे चांदेकसारेचे नागरिक सांगत आहे. या पावसाची ७३ मी.मीटर एवढी नोंद करण्यात आलेली आहे. युवा नेते आशुतोष काळे यांनी पावसामुळे सर्वत्र साचलेले पाणी व चिखलामुळे फिरता येत नसतांनाही कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता प्रत्येक कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेतली. ज्या शेतक-यांचे कांदा चाळीचे नुकसान झाले साठविलेला कांदा पाण्यात वाहून जावून नुकसान झाले, ज्या नागरिकांच्या शेळ्या, कोंबड्या दगावल्यामुळे नुकसान झाले आहे अशा नागरिकांना तातडीने आर्थिक मदत मिळवून देवू असे आश्वासन देत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने शासनाची मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. नागरिकांना मदत करण्यासाठी सभापती सौ.अनुसयाताई होन, जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनाली रोहमारे, संचालक आनंदराव चव्हाण, रोहीदास होन, राहुल रोहमारे, माजी सरपंच मतीन शेख, शंकरराव चव्हाण, राजू होन, संजय होन, चंद्रकांत होन, कर्णा चव्हाण, शरद होन, दादासाहेब होन, भय्या मिठू सय्यद,नूर मोहंमद शेख, सय्यद बाबा शेख, किरण माळी, विजय माळी, अमोल माळी, अकीलभाई शेख, अशरब सय्यद, मोईन शेख आदी कार्यकर्त्यांनी मदत कार्यात मोठी मदत केली.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram