नियमाने जरी निवृत्त व्हावे लागले तरी मनाने मात्र कधीही निवृत्त होऊ नका - आशुतोष काळे

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाला यशाच्या शिखरावर घेवून जाण्यात कर्मचा-यांचा मोलाचा वाटा आहे. प्रत्येक कर्मचा-याला विशिष्ट सेवेनंतर नियमानुसार सेवानिवृत्त हे व्हावेच लागते. प्रदीर्घ सेवेतून कर्मचारी निवृत्त होत असतांना माझ्या मनाला कुठतरी खंत जरूर वाटत आहे.परंतु निवृत्त झालेले सर्वच कर्मचारी काळे परिवारातले होते आणि यापुढेही राहणार आहे. निवृत्त कर्मचा-यांनी नियमाने जरी निवृत्त व्हावे लागले तरी मनाने मात्र कधीही निवृत्त होऊ नका असा मौलिक सल्ला कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी निवृत्त कर्मचा-यांना दिला. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व आसवनी विभागातील एकूण ४२ कर्मचा-यांचा सेवा निवृत्ती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी साखर कारखाना ३४ व आसवनी विभागातील ८ अशा एकूण ४२ कर्मचा-यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला ते पुढे म्हणाले की, माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी या उद्योग समुहाची उभारणी करतांना एक कुटुंब उभे केले आहे. एक कुटुंब प्रमुख या नात्याने त्यांनी व माजी आमदार अशोकराव काळे यांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली आहे. त्यामुळे आपला कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचा पाया मजबूत आहे. कधी नैसर्गिक तर कधी अनैसर्गिक संकटांना आपल्या उद्योगसमूहाने आजवर मोठ्या धैर्याने परतावून लावले आहे. सर्व कर्मचाऱ्यांचे कष्ट, ऊस उत्पादकांचे आशीर्वाद व विश्वासाच्या जोरावर आपला उद्योग समूह आज सहकार क्षेत्रात आपले पाय घट्ट रोवून उभा आहे. अशी संकटे व आव्हाने पेलण्याची ताकद व प्रेरणा तुमच्या आशीर्वादाने आजपर्यंत मिळत आहे ती यापुढेही मिळत राहील असा आशावाद व्यक्त करून भविष्यात कोणतीही अडचण आली तरी निःसंकोपणे अधिकाराने आपला हक्काचा माणूस समजून माझ्याकडे या असे भावनिक आव्हान युवा नेते आशुतोष काळे यांनी निवृत्त कर्मचा-यांना केले. याप्रसंगी कारखान्याचे नवनिर्वाचित व्हा. चेअरमन सुनील शिंदे, सर्व संचालक मंडळ, पंचायत समितीचे उपसभापति अनिल कदम, यांचेसह कारखान्याचे कार्यकारी संचालक संचालक गिरीश जगताप, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर जे. ए. भिडे, कारखान्याचे जनरल मॅनेजर ए. व्ही. काळे, सेक्रेटरी एस. एस. कोल्हे ऑफिस सुपरिटेडेट बी. बी. सय्यद, चिफ इंजिनियर डी. बी. चव्हाण, शेतकी अधिकारी के.व्ही. कापसे, चिफ केमिस्ट एस. जे. ताकवणे विविध खात्यांचे प्रमुख पदाधिकारी यांचेसह माजी कामगार मोठ्या संख्येने आपल्या परिवारासह उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक सेक्रेटरी सुनिल कोल्हे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक अरुण चंद्रे यांनी केले तर आभार व्हा. चेअरमन सुनील शिंदे यांनी मानले. यावेळी निवृत्त कर्मचारी व त्यांचे परीवाराने आपले मनोगत व्यक्त करतांना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी निवृत्त कर्मचारी व त्यांचे परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram