डॉक्टर परमेश्वराने पाठवविलेले देवदूत रुग्ण सेवा ईश्वर सेवेपेक्षा कमी नाही – आशुतोष काळे

रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य नेहमी आपल्या डोळ्यासमोर ठेवत प्रत्येक रुग्णाला आपल्याच कुटुंबातील सदस्य समजून उपचारासाठी आलेल्या रुग्णांवर विविध डॉक्टर मनोभावे उपचार करीत असतात. त्यामुळे डॉक्टर हे परमेश्वराने पाठवविलेले देवदूत असून डॉक्टर व त्यांचे सर्व सहकारी कर्मचारी रुग्णांसाठी करीत असलेली सेवा ही ईश्वर सेवेपेक्षा निश्चितपणे कमी नाही असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे केले. कोपरगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने डॉक्टर डे निमित्त तालुक्यातील सर्वच डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुभाष मुंदडा होते. यावेळी बोलतांना युवा नेते आशुतोष काळे म्हणाले की, समाजातील सर्व नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी समाजसेवेचे व्रत अंगीकारून डॉक्टर रुग्ण सेवा करीत असतात. सेवा करीत असतांना दिवस-रात्र, वेळ, काळ व परिस्थितीची तमा न बाळगता डॉक्टरांची रुग्ण सेवा अविरतपणे सुरु असते. उपचारासाठी आलेला रुग्ण जेव्हा उपचार घेवून पूर्णपणे बरा होतो. त्यावेळी त्या रुग्णाच्या चेह-यावरील फुललेले हसू डॉक्टरांना केलेल्या सेवेचे फळ असते. यापेक्षा डॉक्टरांची रुग्णांकडून कोणतीही अपेक्षा नसते. समाजातील या देवदूतांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी डॉक्टरांचा सत्कार सोहळा आयोजित केला असल्याचे त्यांनी सांगितले. डॉक्टर आपल्या अनुभवातून व प्रत्येक रुग्ण हा १०० टक्के बरा व्हावा या उद्देशातून रुग्णांवर उपचार करीत असतात. परंतु काही वेळेस डॉक्टरांची कोणतीही चूक नसतांना गैरसमजातून रुग्णांच्या नातेवाइकांकडून रुग्णालयाची मोडतोड करून डॉक्टरांवर हल्ले होतात हे कुठेतरी थांबले पाहिजे असे मत त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. याप्रसंगी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे, डॉ. शेखर फडके, डॉ.मुळे, डॉ. गिरीश क्षत्रिय, डॉ. विलास आचारी, डॉ.अमोल अजमेरे, डॉ. विजय कोठारी, डॉ. विजय क्षिरसागर, डॉ.रमेश सोनवणे, डॉ. संदीप मुरुमकर, डॉ. भगवान शिंदे, व संदीप वाबळे, डॉ. पंकज बूब, डॉ.शंतनू सरवार, डॉ. मयूर जोर्वेकर, डॉ. आप्पासाहेब आदिक, डॉ. कृष्णा फुलसुंदर, डॉ. झिया शेख, डॉ.राजेंद्र पवार, डॉ. मच्छिंद्र बर्डे, डॉ. बंशी ढाकणे, डॉ. शांताराम आढाव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विधाटे, डॉ. आय के सय्यद, डॉ. दिनेश पानगव्हाणे, डॉ. दत्तात्रय कोळपे, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. तुषार गलांडे, डॉ. चन्द्रशेखर आव्हाड, डॉ. राजेंद्र रोकडे, डॉ.कुणाल घायतडकर डॉ. सुमिता आदिक, डॉ. सुषमा आचारी, डॉ. सौ. क्षत्रिय, डॉ. सौ. वर्षा झंवर, डॉ. किरण नेने, डॉ. अर्चना मुरुमकर, डॉ. मंजुषा गायकवाड, डॉ. दिपाली आचारी, गुजराथी ताई,पंचायत समितीच्या सभापती सौ. अनुसयाताई होन, उपसभापती अनिल कदम, राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुनील गंगुले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, सौ. प्रतिभा शिलेदार, सौ. वर्षाताई गंगुले, सौ. माधवी वाकचौरे, अजीज शेख सुनील शिलेदार, हिरामण गंगुले, नवाज कुरेशी, फकीरमामू कुरेशी, राजेंद्र आभाळे, रमेश गवळी, राहुल देवळालीकर, संदीप कपिले, ऋषिकेश खैरनार, चन्द्रशेखर म्हस्के, इम्तियाज अत्तार, निखील डांगे, मुकुंद इंगळे, गोरख पंडोरे, गणेश लकारे, वाल्मिक लहीरे, संतोष टोरपे, बाला गंगुले, सचिन परदेशी, वडांगळे सर, कुंदन भारंबे आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram