माजी आमदार अशोकराव काळे यांच्या हस्ते प.पु. वै. तुकारामबाबा खेडलेकर पायी दिंडी सोहळ्याचे पालखी पूजन

नगर,नाशिक सह संपूर्ण महाराष्ट्राची प्रतीपंढरी म्हणून ओळखली जाणा-या तमाम वारक-यांचे श्रद्धास्थान असलेले श्री. क्षेत्र खेडलेझुंगे ता. निफाड येथून सालाबादप्रमाणे याहीवर्षी ह.भ. प. गुरुवर्य रघुनाथ महाराज खटाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विठुरायाच्या दर्शनाची आस घेवून निघालेल्या शेकडो वारक-यांच्या सोबतीने श्री. क्षेत्र खेडलेझुंगे ते श्री. क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून गुरुवार दिनांक ५/६/२०१८ रोजी श्री. क्षेत्र खेडलेझुंगे येथून टाळ मृदुंगाच्या गजरात श्री. क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. हा पायी दिंडी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करीत असतांना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आगमन झाले त्यावेळी कोपरगाव तालुक्याचे माजी आमदार अशोकराव काळे यांनी वारक-यांचे स्वागत करून प.पु. वै. तुकारामबाबा खेडलेकर महाराजांच्या रथाचे व पालखीचे विधिवत पूजन करून ह.भ. प. गुरुवर्य रघुनाथ महाराज खटाणे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कारखान्याचे व्हा. चेअरमन सुनील शिंदे, संचालक मीननाथ बारगळ, हरिभाऊ शिंदे, राजेंद्र मेहेरखांब, सुरेगावचे नवनिर्वाचित सरपंच शशिकांत वाबळे, शरद पवार पतसंस्थेचे चेअरमन राधु कोळपे, गौतम बँकेचे संचालक राजेंद्र ढोमसे , कारखान्याचे जनरल मॅनेजर ए. व्ही. काळे, ऑफिस सुपरिटेंडेंट बी.बी.सय्यद, चीफ इंजिनिअर दौलतराव चव्हाण, चीफ केमिस्ट ताकवणे तसेच भगवान विष्णू मंदिर कमिटीचे अध्यक्ष पोपट जाधव, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना उद्योग समुहाचे पदाधिकारी व भजनी मंडळाचे सदस्य व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी कारखाना कार्यस्थळावर माजी आमदार अशोकराव काळे यांच्या वतीने वारक-यांना संतभोजन देण्यात आले. याप्रसंगी कानळद आश्रमाचे ह.भ.प. ज्ञानेश्वरदासजी महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनात वारकरी व भावीक भक्ती रसात न्हावून गेले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram