निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची एकाच वर्षात पूर्तता – सौ. चैतालीताई काळे

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेने युवा नेते आशुतोष काळे यांच्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची एकाच वर्षात पूर्तता केली असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे केले. जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण योजने अंतर्गत सभापती सौ. अनुसया होन यांनी युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न करून चांदेकसारे येथील महिलांना घरघंटी (घरगुती पिठाची गिरणी) व अपंगाना तीन चाकी सायकलसाठी ७,०००/- रुपयांचे अनुदान वाटप सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब खरात होते. यावेळी बोलतांना त्या पुढे म्हणाल्या की, काही निसर्गनिर्मित संकट सांगून येत नसतात परंतु ज्या ज्यावेळी कोपरगाव तालुक्यातील नागरिकांवर अशी संकटे आली त्या त्यावेळी काळे परिवार धावून आला आहे. मागील महिन्यात आनंदवाडी येथे पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या नागरिकांना कर्मवीर काळे कारखाना व उद्योग समूहाच्या वतीने आवश्यक असलेली मदत त्यावेळी करण्यात आली आहे. परंतु काही व्यक्तींनी या पूरग्रस्तांना किरकोळ मदत देवून पूरग्रस्त नागरीकांच्या सर्व अडचणी सोडविल्या असल्याचे वर्तमान पत्रातून प्रसिद्ध केले होते परंतु प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. आजही या नागरिकांचे पुराच्या पाण्यात वाहून गेलेले रेशन कार्ड, आधार कार्ड आदी महत्वाचे कागदपत्र यांना आजपर्यंत मिळालेले नाही. अशा नागरिकांनी तातडीने युवा नेते आशुतोष काळे यांच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक असणारे कागदपत्रे जमा करावी असे आवाहन केले. यावेळी अॅड. राहुल रोहमारे, डॉ. गोरक्षनाथ रोकडे यांनीही आपली मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्तविक सुधाकर होन यांनी केले. सूत्रसंचालन माजी सरपंच मतीन शेख यांनी तर आभार शंकरराव चव्हाण यांनी मानले. यावेळी सभापती सौ. अनुसया होन, अॅड. राहुल रोहमारे, काळे कारखान्याचे संचालक आनंदराव चव्हाण, रोहीदास होन, डॉ. गोरक्षनाथ रोकडे, भीमा होन, दादासाहेब होन,माजी सभापती सौ. आशा खरात ग्रामपंचायत सदस्य युनुस शेख, अजित होन, माणिक खरात, सौ. दिपाली होन, सौ. रंजना होन, ग्रामसेवक सुकेकर आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram