कोपरगाव मध्ये सुरु झाली वैद्यकीय उपकरण बँक | कर्मवीर प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम

आपण सध्या बघतो अल्प दरात किंवा स्थावर मालमत्तेवर कर्ज देणा-या नवनव्या बँका, पतसंस्था, फायनान्स कंपन्या यांच्या जोरात जाहिरातबाजी सुरु आहेत. यामागे एकमेव उद्देश पैसे कमविणे एवढाच आहे. परंतु कोपरगावमध्ये एक आगळी वेगळी बँक स्थापन करण्यात आली आहे. या बँकेमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अर्थ सहाय्य मिळणार नाही. पण जे गरजवंत रुग्ण आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे वैद्यकीय उपकरणे खरेदी करू शकत नाही अशा रुग्णांसाठी मोफत वैद्यकीय उपकरण बँक सुरु करण्यात आली आहे. समाजासाठी आपल आयुष्य वेचणारे माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या नावाने कोपरगाव शहरात कर्मवीर प्रतिष्ठान नागरिकांचे सामाजिक प्रश्न सोडवीत आहे. यापुढे जावून समाजातील गरजू रुग्णांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे. या भावनेतून स्व. काळे साहेबांच्या समाजकार्याला शोभेल असा गरजू रुग्णांसाठी मोफत वैद्यकीय उपकरण बँक हा अभिनव उपक्रम कर्मवीर प्रतिष्ठाणच्या वतीने कोपरगाव शहरात सुरु करण्यात आला आहे. या वैद्यकीय उपकरण बँकचे उदघाटन नुकतेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवानेते आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते साईबाबा तपोभूमी कोपरगाव येथे करण्यात आले. या वैद्यकीय उपकरण बँकेच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या गरजेचे वैद्यकीय उपकरण वापरासाठी मोफत मिळणार आहे. तसेच रुग्णाची गरज संपल्यानंतर ही उपकरणे पुन्हा बँकेत जमा करावी लागणार आहे. समाजासाठी अशा प्रकारे काम करणारी ही वैद्यकीय उपकरण बँक कोपरगाव शहरात सुरू केल्याबद्दल युवानेते आशुतोषदादा काळे यांनी कर्मवीर प्रतिष्ठाणच्या सर्व सदस्यांचे कौतुक केले व गरजू रुग्णांनी या वैद्यकीय उपकरण बँकेचा लाभ घ्यावा असे यावेळी आवाहन केले. या वैद्यकीय उपकरण बँकेमधून रुग्णांना अड्जस्टेबल पलंग, व्हील चेअर, वॉकर, पाण्याची गादी आदी साहित्य गरजु रुग्नांसाठी मोफत वापरा साठी उपलब्ध होणार असून भविष्यात इतरही साहित्य वैद्यकीय उपकरण बँकेमार्फत मोफत पुरविण्यात येणार असल्याची माहिती कर्मवीर प्रतिष्ठाणच्यावतीने देण्यात आली आहे. याप्रसंगी सभापती अनुसयाताई होन, छबुराव आव्हाड, दत्तोबा जगताप, कोपरगाव जिनिंग-प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, विजयराव आढाव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूलेनगरसेवक-गटनेते वीरेन बोरावके, अजीज शेख, युवक अध्यक्ष नवाज कुरेशी, रमेश गवळी, उद्धव बोरावके, निवृत्ती शिंदे, बापू वढणे, बाला गंगूले, निलेश उदावंत, कर्मवीर प्रतिष्ठाणचे डॉ. चन्द्रशेखर आव्हाड, राजेंद्र आभाळे, राजेंद्र बोरावके, नितीन बनसोडे, सचिन बढे, ऋषिकेश खैरनार, नारायण लांडगे, प्रदीप कुऱ्हाडे, मुकुंद इंगळे, प्रसाद उदावंत, कुलदीप लवांडे, किरण पवार, फिरोज पठाण तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, कर्मवीर प्रतिष्ठाणचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram