शैक्षणिक अडचणी सोडविण्यास सदैव कटिबद्ध – आशुतोष काळे

मा. खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील गोरगरीब, कष्टकरी व शेतक-यांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी खर्ची घातलं. त्यांच्याच आदर्श विचारांच्या पावलावर पाऊल ठेवून माझी वाटचाल सुरु असून शैक्षणिक अडचणी सोडविण्यास आपण सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवानेते आशुतोष काळे यांनी केले. युवानेते आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्री. सुनील गंगूले यांच्या सहकार्यातून कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंद विद्यालयात युवानेते आशुतोषदादा काळे यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन चंद्रकांतशेठ ठोळे, अध्यक्ष कैलासशेठ ठोळे, सहसचिव सचिन अजमेरे, सदस्य डॉ. अमोल अजमेरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव व नगरसेवक संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक वीरेन बोरावके, मंदार पहाडे, सौ. प्रतिभाताई शिलेदार, मुख्याध्यापिका सौ. पांडे मॅडम, सुनील शिलेदार, अजीज शेख, वाल्मिक लहिरे, रमेश गवळी, राहुल देवळालीकर, निखिल डांगे, तुपसुंदर सर, सौ. मालकर मॅडम तसेच शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी चिमुकल्यांनी आशुतोष काळे यांची मुलाखत घेवून तुम्ही परदेशात शिक्षण घेतले, परदेशातील शिक्षण चांगले की आपल्या देशातील? राजकारणात अभ्यास करावा लागतो का? त्यावेळी चिमुकल्यांच्या प्रश्नांना युवानेते आशुतोष काळे यांनी शिक्षण कोणतेही असो ते चांगलेच असे उत्तर दिले व चिमुकल्यांच्या इतर प्रश्नांचे दिलखुलासपणे उत्तरे देवून त्यांचे समाधान करून त्यांच्या चेह-यावर हास्य फुलविले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram