कोपरगाव तालुक्याचे नेतृत्व करण्यास आशुतोष सक्षम – काका कोयटे

आज आपल्या कोपरगाव तालुक्याचा आमदार कोण आहे हे महत्वाचे नाही पण ज्या अभ्यासू वृत्तीने संपूर्ण कोपरगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी हे आपले नैतिक कर्तव्य आहे. ही भावना आपल्या हृदयात ठेवून तालुक्याच्या जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र सातत्याने झटत असलेला युवक नेता म्हणून आशुतोषची जनसामान्यांमध्ये प्रतिमा तयार झाली आहे. जनतेच्या भल्यासाठी आशुतोष करीत असलेला संघर्ष पाहता या कोपरगाव तालुक्याचे नेतृत्व करण्यास आशुतोष सक्षम असल्याची पावती अखिल भारतीय पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी आशुतोष काळे यांना दिली. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित व्यापारी धर्मशाळा कोपरगाव येथे त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. आशुतोषला कोपरगाव तालुक्याच्या प्रश्नाची उत्तम जान असून जनतेप्रती असलेली तळमळ कौतुकास्पद आहे. माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे व माजी आमदार अशोकराव काळे यांनी कोपरगाव तालुक्याच्या हक्काच्या पाण्याचा सुरु केलेला लढा आजही पोटतिडकीने आशुतोष सुप्रीम कोर्टात लढत आहे. त्यामुळे स्व. काळे साहेबांचा वसा व वारसा चालविण्यास आशुतोषचे बाहू समर्थ असल्याचे गौरवदगार त्यांनी यावेळी काढले. याप्रसंगी प.पु.मोहनराव चव्हाण, नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, अशोक रोहमारे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष जी.प.सदस्य राजेश परजणे, राजेंद्र जाधव, कोपरगाव व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुधीर डागा यांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघ, लायन्स क्लब, इंडियन मेडिकल असोसिएशन, वकील बार असोसिएशन, इंजिनीअर्स असोसिएशन,मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन, सकल मराठा समाज, सकल जैन समाज, सकल मुस्लिम समाज, नाभिक समाज सेवा संघ, माळी समाज सेवा संघ, परीट समाज सेवा संघ, मातंग समाज सेवा संघ, धनगर समाज सेवा संघ, कहार समाज सेवा संघ, कोपरगाव भाजी विक्रेता संघ, मार्केट कमिटी व्यापारी, हमाल-मापाडी संघ, नगरपालिका कर्मचारी संघटना, एस.टी. कामगार संघटना, कोपरगाव तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी, विविध शाळा महाविद्यालयातील प्राध्यापक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना,कोपरगाव तालुका व शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, धार्मिक, कला-क्रीडा क्षेत्रातील मान्यवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप वर्पे यांनी केले. फोटो ओळ – युवा नेते आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा विविध समाज व संघटनाच्या वतीने जाहीर सत्कार करतांना अखिल भारतीय पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, अशोक रोहमारे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष जी.प.सदस्य राजेश परजणे, राजेंद्र जाधव आदी.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram