ग्रामीण भागाच्या पाणी पुरवठा योजना मार्गी ग्रामस्थानच्या वतीने आशुतोष काळे यांचा सत्कार

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमा योजने अंतर्गत माजी आमदार अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात कोपरगाव तालुक्यातील विविध गावातील पाणी योजनांचे प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. या योजनांचे प्रस्ताव तातडीने मार्गी लागावे यासाठी युवा नेते आशुतोष काळे यांनी युद्धपातळीवर प्रयत्न केल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील सहा गावातील पाणी पुरवठा योजना व चार गावातील वितरण व्यवस्थेसाठी तब्बल ४० कोटी रुपये मंजूर करण्यात आले त्याबद्दल या गावातील ग्रामस्थांनी नुकताच पंचायत समिती कोपरगाव येथे सत्कार करून आभार मानले. यामध्ये मंजूर ९६ लाख ५० हजार,शहाजापूर८१ लाख २५ हजार, येसगाव ३० लाख, कोळपेवाडी १ कोटी ८९ लाख, सुरेगाव १९ कोटी, वारी – कान्हेगाव १४ कोटी, खोपडी ४२ लाख ३५ हजार रुपये पाणी पुरवठा योजनेसाठी मंजूर करण्यात आले आहे. तसेच बहादरपूर, धोंडेवाडी, वेस, सोयेगाव या गावांसाठी प्रत्येकी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लागणार आहे त्यामुळे या गावातील नागरिकांनी आशुतोष काळे यांचा सत्कार करून आभार मानले. याकामी जी. प. सदस्य राजेश परजणे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती सौ अनुसया होन होत्या. कार्यक्रमाचे प्रास्तविक उपसभापती अनिल कदम यांनी केले. जी. प. सदस्य राजेश परजणे, गटनेते अर्जुनराव काळे,यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जी. प. सदस्य राजेश परजणे,सुधाकर दंडवते,सौ सोनाली रोहमारे सोनाली साबळे,उपसभापती अनिल कदम,सदस्य गटनेते अर्जुनराव काळे, मधुकर टेके,श्रावण आसने, सौ पूर्णिमा जगधने, सौ. योगिता पवार, प्रशांत वाबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram