रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आदी सामाजिक उपक्रमांनी आशुतोष काळे यांचा वाढदिवस साजरा

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांचा वाढदिवस रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, खाऊ वाटप आदी सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जोपासत कोपरगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना राजमुद्रा प्रतिष्ठाण ट्रस्ट दत्तनगर, कोपरगाव यांच्या वतीने प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या हस्ते शूज व सँडलचे वाटप करण्यात आले. जय भवानी मित्र मंडळ कोपरगाव व संजीवनी रक्त पेढी नासिक यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ३३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी कोपरगाव तालुक्यातील धोत्रे, दहिगाव बोलका,भोजडे, ओगदी, सडे, खोपडी, कुंभारी, कोकमठाण,माहेगाव देशमुख, सी. एम. मेहता कन्या विद्यालय कोपरगाव, रयत संकुल गौतमनगर, कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंग सोसायटी, सौ. सुशीलामाई काळे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गौतमनगर, एस. एस. जी. एम. कॉलेज, गौतम पब्लिक स्कूल, जि. प. शाळा माहेगाव देशमुख, आदी ठिकाणी वृक्षारोपन करण्यात आले. युवानेते आशुतोषदादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त शहाजापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोकमठाण येथील जी.प. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. कुंभारीच्या शाळेतही विद्यार्थ्यांना शूज, सॉक्स व सँडल व खाऊचे वाटप करण्यात आले. चासनळी येथील शाळेतील गरजू विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले. कोपरगाव शहरातही वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक अजीज शेख व आदर्श ग्रुप कोपरगावच्या कार्यकर्त्यांनी अमरधाम येथे स्वच्छता मोहीम राबवून अमरधाम स्वच्छ केला. शहरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये वीर सम्राट प्रतिष्ठान यांचे वतीने औषध फवारणी करण्यात आली. कोपरगाव पंचायत समितीच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत सर्वेक्षण व्हॅनचे उदघाटन सभापती सौ. अनुसयाताई होन यांच्या शुभहस्ते करण्यात आले. अशा प्रकारे फक्त सामाजिक बांधिलकी जोपासतच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी युवा नेते आशुतोष काळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram