कर्मवीर एज्युकेशन सोसायटीचे शैक्षणिक संकुल व रयत संकुल मध्ये ७२वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूल, सौ. सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व महाविद्यालय, गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुट गौतमनगर व रयत संकुल गौतमनगर येथे भारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर व श्री. छत्रपती संभाजी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रयत संकुलाच्या भव्य मैदानावर कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी आशुतोष काळे हे विद्यार्थ्यांना संबोधित करतांना म्हणाले की, आपला देश आर्थिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे. आपल्या देशाला आर्थिक महासत्ता करण्यासाठी तरुणाईचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. आपल्या देशाची विविधता जगात प्रसिद्ध आहे. आपल्या देशात विविध राज्यात अनेक भाषा, वेगवेगळे धर्म, वेगळ्या उपासना, विविध प्रकारच्या वेशभूषा, भिन्न सांस्कृतिक परंपरा, जातीव्यवस्था एवढ सारे असूनही आपल्या भारतीय समाजाची सांस्कृतिक वीण एकदम घट्ट आहे आणि हीच आपली खरी ताकत आहे. ही ताकत, ही एकता व अखंडता टिकविण्यासाठी सर्वांनी एकसंघ राहावे पाहिजे असा महत्वपूर्ण संदेश त्यांनी यावेळी दिला. याप्रसंगी जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे, अभिषेक काळे, विश्वस्त सिकंदर पटेल, प्राचार्य नूर शेख, प्राचार्य सुभाष भारती, प्राचार्या डॉ. सौ.विजया गुरसळ, प्राचार्य काळे एस. एच., प्र. प्राचार्य साहेबराव गायकवाड, मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. फोटो ओळ - रयत संकुल गौतमनगर येथे युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram