शेतक-यांचे हित जोपासावे – आशुतोष काळे | कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब लिलाव खरेदी सुरु

कृषी उत्पन्न बाजार समितीकडे एक सहकारी संस्था म्हणून पहिले जाते. डाळिंब लिलाव मार्केट सुरु झाल्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची चिंता मिटली असून शेतकऱ्यांचे हित कसे जोपासले जाईल याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीने विशेष लक्ष द्यावे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक वाढावा यासाठी शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी सहकार्य व सामंजस्य ठेवावे असे प्रतिपादन युवानेते आशुतोष काळे यांनी केले. कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून डाळिंब लिलाव मार्केटचा शुभारंभ कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवानेते आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कोपरगाव बाजार समितीची वाटचाल प्रगतीच्या दृष्टीने सुरु आहे. भविष्यात खुले कांदा मार्केट त्याच बरोबर टोमॅटो मार्केट सुरु करायचे आहे. प्रलंबित असणारे कॉक्रिटिकरणाचे काम मार्गी लावणार असून बैल बाजारचे कॉक्रिटिकरणाचे काम करायचे आहे. इतर राज्यातील बाजार समित्यांप्रमाणे आपलीही कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व सोयींनी अद्यावत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शेतक-यांच्या शेतमालाचा वेळेवर लिलाव व्हावा यासाठी सकाळी १०.०० ची वेळ निश्चित केलेली आहे. शासनाने शेतक-यांबरोबर व्यापा-यांनाही काही जाचक अटी घातल्या आहेत. यामधून योग्य मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने शासनाकडून तूर, मुग, सोयाबीन, हरबरा खरेदी केंद्र सुरु करण्यास परवानगी मिळविली आहे. आजही शासनाकडे हरबरा खरेदीचे पैसे बाकी असून ते मिळविण्यासाठी माझे प्रयत्न सुरु असल्याचे आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.।याप्रसंगी प.पु. श्री दत्तगिरी महाराज, तहसीलदार किशोर कदम,गोदावरी दूष संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, राजेंद्र जाधव, पंचायत समिती सभापती सौ. अनुसयाताई होन, तालुका कृषी अधिकारी अशोकराव आढाव, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, ग्रामीणचे प्रवीण लोखंडे, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे, उपसभापती राजेंद्र निकोले, सर्व संचालक मंडळ, व्यापारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram