मुस्लीम बांधवाना आशुतोष काळेंनी दिल्या बकरीईदच्या शुभेच्छा

सर्वधर्म समभाव या विचारांची जपणूक करणा-या आपल्या देशात अनेक जाती धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. सर्व जाती धर्माचे, समाजाचे बांधव आपले विविध सण दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरे करतात. मुस्लीम बांधवही रमजान ईद सणाएवढेच महत्त्व असणारा बकरी ईद सणही मोठया उत्साहात साजरा करतात. या सणामध्ये हिंदू बांधव मुस्लीम बांधवांच्या गळ्यात गळा घालून देत असलेल्या शुभेच्छा आपल्या देशाची एकता किती भक्कम आहे याची साक्ष देत असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. कोपरगाव येथील ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधवाना बकरी ईदच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी ते बोलत होते. कोपरगाव शहरात मोठ्या उत्साहामध्ये मुस्लीम बांधवांनी बकरी ईदचा सण साजरा केला. मुस्लीम बांधवांनी ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण केले. याप्रसंगी आशुतोष काळे यांनी सर्व मुस्लीम बांधवाना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या मुस्लीम बांधवाना शुभेच्छा दिल्या. चिमुकल्यांनीही एकमेकांना आलिंगन देवून बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी आपल्या देशाप्रती असलेली बांधिलकी जपत मुस्लीम बांधवांनी केरळ राज्यात पुराचा तडाखा बसलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी निधी जमा केला त्यामध्ये आशुतोष काळे यांनीही सढळ हाताने पूरग्रस्तांना मदत केली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, सुनील शिलेदार, संदीप पगारे, हिरामण गंगुले, डॉ. चन्द्रशेखर आव्हाड, अजीज शेख, युवक चे अध्यक्ष नवाज कुरेशी, मुकुंद इंगळे, राजेंद्र आभाळे, बाळासाहेब सोनटक्के, अॅड. मनोज कडू, चांदभाई पठान, इम्तियाज अत्तार, फकीरमामू कुरेशी, प्रशांत वाबळे, दिनकर खरे, नारायण लांडगे, रावसाहेब साठे, वाल्मिक लाहीरे, अजगर खाटीक, जावेद शेख, हारून शेख, धनंजय कहार, बाबा गंगुले, संतोष टोरपे, राहुल देवळालिकर,संदीप कपिले, निखील डांगे, आदी मान्यवरांसह मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram