प्रत्येक कुटुंबापर्यंत पाणी पोहोचवा – आशुतोष काळे

माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात कोपरगाव तालुक्यातील नळ पाणी पुरवठा योजनांचे प्रस्ताव पाठविले या प्रस्तावांना शासनाने मंजुरी दिल्यामुळे जवळपास ५२ कोटी रुपये पाणी पुरवठा योजनेसाठी मंजूर करण्यात आले आहे. या पाणी योजनांचे कामे तातडीने मार्गी लावून वाड्या वस्त्यासह प्रत्येक कुटुंबापर्यंत पाणी पोहोचवा अशा सुचना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी दिल्या आहे. कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव, कोळपेवाडी,मंजूर, शहाजापूर, येसगाव, जेऊर कुंभारी, रवंदे, मळेगाव थडी,कुंभारी, वारी, रांजणगाव देशमुख, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, सोयेगाव, वेस, मनेगाव, आदी गावातील नळ पाणी पुरवठा योजनांसाठी व वितरण व्यवस्थेसाठी ५० कोटी ८३ लाख ७५ हजार रुपयांचा निधी मंजुर झालेला आहे. त्या संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामसेवक, सरपंच, यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आशुतोष काळे यांनी सर्व पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेतला .या योजना तातडीने पूर्ण व्हाव्या यासाठी कागद, पत्रांची पूर्तता करा. योजना सुरु करण्यासाठी काही अडचणी आल्यास आपल्याशी संपर्क करावा. या योजनेचे काम पाहणारे अधिका-यांनी तातडीने या योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे. पाणी योजना लवकरात लवकर पूर्ण कशा होतील यासाठी ग्रामसेवक, सरपंच यांनीही यामध्ये जातीने लक्ष घालावे असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी राजेंद्र पंडोरे, मिलिंद भांगरे, पंचायत समिती उपाभियंता उत्तम पवार, आश्विन वाघ, काळे कारखान्याचे व्हा. चेअरमन सुनील शिंदे, पंचायत समिती उपसभापति अनिल कदम, सदस्य अर्जुनराव काळे, सुधाकर होन, सुरेगाव तंटा मुक्ती अध्यक्ष वाल्मिकआप्पा कोळपे, कोळपेवाडीचे सरपंच सूर्यभान कोळपे, शहाजापुरचे सरपंच सचिन वाबळे, सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे, कुंभारीचे सरपंच प्रशांत घुले, मळेगाव थडीचे सरपंच गोरख दवंगे, अंजनापुरचे सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे, मंजूरचे सरपंच जामदार सर, प्रशांत वाबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram