पेन्शन योजनेचा लाभ घ्या – सौ. पुष्पाताई काळे

आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, आयुष्याच्या उतार वयात आपल्या कोणतीही आर्थिक अडचण येवू नये यासाठी मनात असूनही आर्थिकखर्च वाढवू नये याची प्रत्येक महिला काळजी घेत असते. महिला वर्ग संपूर्ण आयुष्यभर पै-पै जोडून आपला संसार करीत असते. प्रत्येक महिलेला काळजी असते ती भविष्याची परंतु शासनाने ६० वर्ष वय पूर्ण पेन्शन योजना सुरु केली असून सर्व महिलांनी या पेन्शन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांनी केले आहे. कोपरगाव शहर व तालुक्यातील बचत गटाच्या महिलांना सामाजिक सुरक्षा योजनेची माहिती देण्यात आली याप्रसंगी सौ. पुष्पाताई काळे बोलत होत्या.त्या पुढे म्हणाल्या की, महिलांच्या विविध अडचणी सोडविणे, महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे यासोबतच महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत प्रियदर्शनी महिला मंडळ काम करीत असल्याचे सांगत त्यांनी महिलांना पेन्शन योजनेबद्दल सखोल मार्गदर्शन केले व कोपरगाव शहर व तालुक्यातील सर्व महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे केले. या योजने अंतर्गत महिलांना वृद्धापकाळासाठी पेन्शन तसेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला विमा सुरक्षा मिळणार असल्याची माहिती सौ. पुष्पाताई काळे यांनी दिली .सदर योजनेचे अर्ज प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या कार्यालयात उद्या दि. २५ ऑगस्ट २०१८ पासून विनामूल्य भरून घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रसंगी कोपरगाव शहर व तालुक्यातील बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram