आजचा विद्यार्थी उद्याच्या भारताचे भविष्य – आशुतोष काळे

वाढलेला अभ्यास व खेळ यांचा मेळ घालतांना विद्यार्थी आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य बिघडते. आरोग्याकडे असाच कानाडोळा केल्यास भविष्यात मोठया त्रासाला सामोरे जावे लागेल हे विद्यार्थी व पालकांनी नेहमी ध्यानात ठेवले पाहिजे. आजचा विद्यार्थी हा आपल्या देशाचे उद्याचे भविष्य आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथे गुरुवर्य तुकारामबाबा विद्यालयात कर्मवीर प्रतिष्ठान कोपरगाव यांचे वतीने माजी आमदार अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी कमी होत असलेले पर्जन्यमान व निसर्गाचा ढासळलेला समतोल यासाठी प्रत्येकाने एक वृक्ष लावून संगोपन करावे असे आवाहन केले. याप्रसंगी डॉ. जोर्वेकर, डॉ. सौ. जोर्वेकर, डॉ.आय. के. सय्यद, कुंभारीचे सरपंच प्रशांत घुले, उपसरपंच दिगंबर बढे, रामराव साळुंके, कोपरगाव जिनिंग-प्रेसिंग सोसायटीचे व्हा. चेअरमन सचिन आव्हाड, कर्मवीर प्रतिष्ठाणचे राजाभाऊ आभाळे, राजेंद्र बोरावके, सचिन बढे, आकाश हलवाई, नितीन बनसोडे, प्रसाद उदावंत, मुकुंद इंगळे, प्रदीप कुऱ्हाडे, भास्कर कदम, पैठणे सर, लक्ष्मण बढे, चांगदेव बढे, आण्णासाहेब बढे, राजेंद्र वारुळे, सोपान ठाणगे, अर्जुन घुले, आशिष थोरात, अशोक वाघ, सोपान कदम, मच्छिंद्र कदम, मुख्याध्यापक आमले सर, मान्यवरांसह विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram