झिरो बजेट नैसर्गिक शेती चळवळीला देत असलेल्या प्रोत्साहनाबद्दलआशुतोष काळेंचा विशेष गौरव

साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त श्री. साईबाबा संस्थान शिर्डी व झिरो बजेट शेती समूह यांचे वतीने दिनांक २८ ऑगस्ट २०१८ ते २ संप्टेंबर २०१८ या कालावधीत कृषी, ऋषी पद्मश्री सुभाषजी पाळेकर यांचे मार्गदर्शनाखाली झिरो बजेट नैसर्गिक शेती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये झिरो बजेट नैसर्गिक शेती चळवळीला प्रोत्साहन देत असल्याबद्दल कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांचा झिरो बजेट शेती समुहाचे वतीने भारत सरकार नीती आयोगाचे उपाध्यक्ष नामदार डॉ.राजीव कुमार,पद्मश्री सुभाषजी पाळेकर, साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, आंध्रप्रदेश सरकारचे शेती, सहकार सल्लागार टी. विजयकुमार यांनी विशेष गौरव केला. दोन वर्षापूर्वी संत जनार्दन स्वामी आश्रम भक्तनिवास कोपरगाव येथे पार पडलेल्या झिरो बजेट नैसर्गिक शेती प्रशिक्षण शिबिरासाठी शेतक-यांप्रती असलेल्या आत्मीयतेतून आशुतोष काळे यांनी भरीव सहकार्य केले होते. पाटपाण्याचा त्यांचा सुरु असलेला संघर्ष शेतक-यांचे हित साधणारा आहे. शेतक-यांना कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल यासाठी त्यांचा सतत प्रयत्न सुरु असतो. त्यांच्या कार्याला नवचैतन्य मिळावे व झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा संपूर्ण राज्यात प्रचार, प्रसार व्हावा या उद्देशातून झिरो बजेट शेती समूह यांचे वतीने आशुतोष काळे यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी भारत सरकार नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, कृषी ऋषी पद्मश्री सुभाषजी पाळेकर, साईबाबा संस्थानचे अध्यक्ष श्री. सुरेश हावरे, उपाध्यक्ष श्री. चंद्रशेखर कदम, आंध्रप्रदेश सरकारचे शेती, सहकार सल्लागार टी. विजयकुमार, नगराध्यक्षा सौ. योगिताताई शेळके, उपाध्यक्ष सुजित गोंदकर, अशोक रोहमारे, वाल्मिक कातकडे, माधवराव देशमुख, राहुल रोहमारे, संदीप रोहमारे, अनुप कातकडे, मंदार आढाव, सौ. नलिनी हावरे, जि. प. सदस्य सौ. सोनाली रोहमारे, सौ. रंजना आढाव, सौ. मीना कातकडे, आदी मान्यवरांसह हजारो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram