भरपूर पाऊस पडावा व शेतकरी सुखी व्हावा – आशुतोष काळे

जून महिन्याच्या सुरुवातीला पडलेल्या पावसाने शेतक-यांच्या चेह-यावर समाधान होते. परंतु मागील दोन महिन्यापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतातील पिकांनी माना टाकल्या आहे. संपूर्ण खरीप हंगाम वाया जाणार या भीतीपोटी बळीराजा चिंतेने ग्रासला आहे. जुनी जाणती व जेष्ठ मंडळी म्हणतात की, गेलेला पाऊस पोळ्याला परत येतो. त्याप्रमाणे शेतक-यांच्या बैल पोळ्याच्या सणाला भरपूर पाऊस पडावा व शेतकरी सुखी व्हावा अशी पार्थना आपण प्रत्येक ग्रामदैवतांच्या चरणी केली असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवानेते आशुतोष काळे यांनी अखंड हरीनाम सप्ताह निमित्ताने आयोजित कीर्तन सोहळ्याप्रसंगी केले. तसेच येणा-या गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोऱ्हाळे, धोंडेवाडी, सोयेगाव, मनेगाव व काकडी या ठिकाणी श्रावण मासानिमित्त सालाबादप्रमाणे याहीवर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रत्येक सप्ताह सोहळ्याच्या सांगता कार्यक्रमाला युवा नेते आशुतोष काळे यांनी उपस्थित राहून ग्रामदेवतांचे व संताचे दर्शन व आशीर्वाद घेतले. ह.भ.प. कोकाटे महाराज, ह.भ.प. शास्त्री महाराज गाडेकर ह.भ.प. मुरूमकर महाराज यांनी आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. यावेळी बोलतांना ह.भ.प.चौधरी महाराज यांनी स्व. माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी शैक्षणिक, सामाजिक, सहकार क्षेत्रातील केलेल्या कामांचा विशेष उल्लेख केला.तसेच माजी आमदार अशोकराव काळे यांनी केलेल्या १० वर्षांचे कामाची आठवण करून त्यांच्या कार्याचा वसा युवा नेते आशुतोष काळे करीत असून या कोपरगाव तालुक्याचे नेतृत्व करतील असे गौरवद्गार काढले. सर्व गावातील सप्ताह स्थळी युवानेते आशुतोष काळे यांचा सत्कार करण्यात आला. सर्व ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केलेली होती.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram