कर्मवीर काळे साहेबांनी सहकारी संस्था स्थापन करून शेतकरी व सर्व सामन्यांचे हित साधले – आशुतोष काळे

माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी सर्वसामान्य नागरिक व शेतकरी यांना डोळ्यासमोर ठेवत अनेक सहकारी संस्थांची निर्मिती केली. या संस्था तळहातावरच्या फोडाप्रमाने जपल्या.चाकोरीबद्ध कारभार करून या सहकारी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे हित साधले असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यानी केले. गौतम सहकारी बँक, शरदराव पवार नागरी सहकारी पतसंस्था व गौतम सहकारी कुक्कुट पालन संस्थेच्या वार्षिक सर्व साधारण सभेत ते बोलत होते. गौतम सहकारी बँकेची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, शरदराव पवार नागरी सहकारी पतसंस्थेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व गौतम सहकारी कुक्कुट पालन या संस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात कर्मवीर शंकरराव काळे सभागृहामध्ये माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. सभेच्या अध्यक्षपदाची सुचना एम. टी. रोहमारे यांनी मांडली सदर सूचनेला सोमनाथ चांदगुडे यांनी अनुमोदन दिले. याप्रसंगी बोलतांना युवा नेते आशुतोष काळे पुढे म्हणाले की, माजी खासदार स्व.शंकररावजी काळे साहेबांनी सहकारी संस्था काटकसरीने चालवून मोठ्या केल्या. साहेबांच्या विचारांच्या पावलावर पाऊल ठेवत माजी आमदार अशोकराव काळे यांनी या संस्थाकडे गांभीर्याने लक्ष देवून या संस्था सतत प्रगतीपथावर ठेवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.अतिशय आव्हानात्मक परीस्थितही संस्थेची प्रगती होत असून गौतम सहकारी बँक तोटामुक्त झाली आहे त्यामुळे या सर्वच संस्था परिसरातील नागरिकांच्या विश्वासाचे प्रतीक ठरल्या आहे. आपल्या या दोनही संस्थांचे व्यवहार रिझर्व बँकेच्या नियमानुसार सुरु असून सर्व व्यवहार संगणकीकृत असल्याचे त्यांनी सांगितले त्याचबरोबर सर्व सोयी सुविधा उपलब्ध असल्याचे सांगून या सुविधांचा लाभ घेवून आपल्या संस्था प्रगतीच्या शिखरावर घेवून जाण्यासाठी आजपर्यंत आपण करीत असलेले सहकार्य यापुढेही ठेवा असे आवाहन त्यांनी उपस्थित सभासदांना केले.तसेच शरद पवार नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना १५ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी करून रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार लवकरच गौतम सहकारी बँकेच्या सभासदांना लाभांश देणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी टाळ्यांच्या गजरात सर्व विषय मंजूर करण्यात आले. याप्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन सुनील शिंदे, संचालक विश्वासराव आहेर, बाळासाहेब बारहाते, राजेंद्र घुमरे, काकासाहेब जावळे, सुधाकर रोहोम, अशोकमामा काळे,अरुण चंद्रे, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, शरद पवार पतसंस्थेचे चेअरमन राधु कोळपे, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, चारुदत्त सिनगर, गौतम बँकेचे व्हा. चेअरमन साहेबलाल शेख, शरदराव पवार पतसंस्थेचे व्हा. चेअरमन सोपानराव गुडघे, सर्व संस्थांचे सन्मानीय संचालक मंडळ, कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप, जनरल मॅनेजर ए. व्ही. काळे. सेक्रेटरी सुनील कोल्हे,ऑफिस सुपरीटेडेंट बाबा सय्यद, बँकेचे सरव्यवस्थापक बापूसाहेब घेमुड, शरदराव पवार पतसंस्थेचे मॅनेजर बाळासाहेब काळे, गौतम सहकारी कुक्कुट पालनचे मॅनेजर सुरेश पेटकर आदी मान्यवरांसह सर्व संस्थांचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेचे प्रास्ताविक बँकेचे सरव्यवस्थापक बापूसाहेब घेमुड यांनी केले सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी नानासाहेब बनसोडे यांनी केले तर आभार संचालक राजेंद्र ढोमसे यांनी मानले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram