आश्वासनांवर भरवसा ठेवलेल्या जनतेचा सरकारकडून विश्वासघात –आशुतोष काळे | इंधन दरवाढीने सर्वसामान्य जनतेचे आर्थिक नियोजन कोलमडले

बहुत हुई महेंगाई की मार, अब की बार मोदी सरकार, अच्छे दिन आने वाले है,कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा अशा फसव्या व भावनिक आश्वासनाला देश व राज्यातील जनतेने २०१४ च्या निवडणुकीवेळी विश्वास ठेवला. फसव्या घोषणा देवून देशात आणि राज्यात आलेल्या केंद्रातील भाजपा व राज्यातील भाजप-शिवसेनेच्या सरकारने दिलेली एकही आश्वासने पूर्ण न करता जनतेचा विश्वासघात केला असून येणा-या निवडणुकीत या सरकारच्या खोट्या आश्वासनाला बळी न पडता या सरकारला खाली खेचा असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांनी पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाप्रसंगी केले. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसची झालेली भरमसाठ दरवाढ व वाढलेल्या महागाईवरून केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी कोपरगाव शहरात कडकडीत बंद पाळून सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगाव शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी श्री. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांनी पुष्पहार अर्पण करून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे रुपांतर तहसील कार्यालयाच्या आवारात झाले. त्यावेळी युवा नेते आशुतोष काळे बोलत होते. यावेळी बोलताना युवानेते आशुतोष काळे म्हणाले की, जनेतेने आघाडी सरकारच्या काळातील पेट्रोल, डीझेल व घरगुती गॅसचे दर यांची तुलना करून या सरकारने शेतक-यांना, व्याप-यांना व सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या खाईत लोटल्याचे दिसून येते. या इंधन दरवाढीने व वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. तरी हे सरकार महागाई आटोक्यात आणण्यासाठी कोणत्याच उपाययोजना करायला तयार नाही. देश व राज्यातील सरकार फक्त उद्योगपतींचे हित साधत असल्याची टीका त्यांनी केली यावेळी तहसीलदार किशोर कदम यांना निवेदन देण्यात आले.याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, राष्ट्रीय कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जाधव,राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला अध्यक्षा सौ. प्रतिभा शिलेदार, सतीश काकडे यांनी या निषेध सभेत देशाच्या व राज्यातील सरकारवर टीका केली. या निषेध मोर्चाला महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ, कोपरगाव तालुका ट्रक-टेम्पो असोसिएशन, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष,आदी संघटनांनी पाठींबा दिल्यामुळे कोपरगाव शहरात नागरिकांकडून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सभापती,राष्ट्रीय कॉंग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे,व्यापारी महासंघ तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी,राष्ट्रीय कॉंग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सभापती, उपसभापति, सदस्य,सर्व नगरसेवक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram