अडचणीत सापडलेल्या जिनिंग, प्रेसिंग सोसायट्यांना सरकारने मदतीचा हात द्यावा – आशुतोष काळे

कापूस शेतक-यांच्या कापसाला योग्य दाम मिळावे या उद्देशातून माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंग सोसायटीची स्थापना केली. त्यावेळी देशात व राज्यात कापसाचे उत्पादन चांगले होते परंतु दिवसेंदिवस निसर्गाच्या लहरीपणामुळे व सरकारचे कापसाच्या बाबतीत असलेल्या धरसोड वृत्तीमुळे कापसाचे उत्पन्न कमी होऊ लागले आहे. जुन्या तंत्रज्ञानानुसार कापूस प्रक्रिया उद्योग चालविण्यासाठी मोटा खर्च होतो व नवीन तंत्रज्ञानानुसार कापूस प्रक्रिया उद्योग करायाचा असेल तर मोठे भांडवल लागते. त्यामुळे एकीकडे कापूस उत्पादन कमी व दुसरीकडे प्रकिया खर्चात झालेली वाढ अशा दुहेरी संकटामुळे जिनिंग, प्रेसिंग सोसायट्यांना अतिशय वाईट दिवस आले असून हा उद्योग वाचविण्यासाठी सरकारने मदतीचा हात द्यावा असे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंग सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, दिवसेंदिवस जिनिंग, प्रेसिंग सोसायट्यांच्या अडचणी वाढतच आहेत. मागील, वर्षी कपाशीचे बोगस बियाणे व बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला. प्रत्येक वर्षी पर्जन्यमान कमी कमी होत आहे.याहीवर्षी पाऊस अतिशय कमी पडल्यामुळे शेतक-यांच्या चिंता वाढल्या आहेत. शेतक-यांना कापूस सहकारी सोसायट्यांना न विकता कुठेही विकण्याची परवानगी आहे त्यामुळे जिनिंग प्रेसिंग सोसायटयांकडे कापसाची आवकही मंदावली. त्यामुळे जिनिंग, प्रेसिंग व्यवसायाच्या अडचणी वाढल्या आहेत. कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी अडचणीत आलेली ही संस्था उर्जीतावस्थेत आणण्यासाठी आपल्या दूरदृष्टी कोनातून १९९३ साली कोरुगेटेड बॉक्स चे दोन युनिट सुरु केले. त्यामुळे संस्था उर्जीतावस्थेत आली. साहेबांना संस्था उर्जीतावस्थेत येण्याच्या समाधानापेक्षा नवीन उद्योग उभारल्यामुळे एकही कामगाराला बेकार व्हावे लागले नाही याचे मोठे समधान होते. त्यांच्या आदर्श विचारांवर माजी आमदार अशोकराव काळे यांनी या संस्था जोपासल्या आहेत. त्यामुळे या सर्वच सहकारी संस्था प्रगतीपथावर असून कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंग सोसायटीला ऑडीट वर्ग अ मिळाला असून २३ लाख रुपयांचा नफा झाला असल्याची माहिती दिली. व भविष्यात सभासदांना लाभांश देण्याचा आपला प्रयत्न असणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सभेचे प्रास्ताविक चेअरमन गोरक्षनाथ जामदार यांनी केले. अहवालवाचन जनरल मॅनेजर एस. एन काशिद यांनी केले. सूत्रसंचालन शेख जी. बी. यांनी केले तर संस्थेचे उपाध्यक्ष सचिन आव्हाड यांनी आभार मानले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सुनील शिंदे, संचालक विठ्ठलराव आसने, अशोकमामा काळे, सुधाकर रोहोम, एम. टी. रोहमारे, लेखापरीक्षक दत्ता खेमनर, निवृत्ती शिंदे, ज्ञानदेव जामदार, भास्करराव वलटे, दिलीप बोरनारे जिनिंग चे संचालक सुदामराव लोंढे, यशवंत आहेर, बाबासाहेब औताडे, गणेश गायकवाड, रावसाहेब मोरे, भाऊसाहेब देवकर आदी मान्यवरांसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram