कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी कामगारांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली -आशुतोष काळे

माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी कोसाका उद्योग समुहाची स्थापना करून शेतक-यांना आर्थिक स्थैर्य तर दिले त्याच बरोबर या उद्योग समूहामध्ये काम करणा-या प्रत्येक कामगारांचे हित जोपासून त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना सेवकांची सहकारी पतपेढीच्या ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा युवा नेते आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच कारखाना कार्यस्थळावरील संस्थेच्या कर्मवीर शंकरराव काळे सभागृहात खेळीमेळीत पार पडली याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कारखाना व उद्योग समूहाच्या भरभराटीमध्ये प्रत्येक घटकांचे योगदान हे बहुमुल्य असते. यामध्ये कामगार वर्गाचा मोठा वाटा आहे.कामगारांची आर्थिक बचत कशी होईल यासाठी कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी आजीवन प्रयत्न केले. त्यांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारावर व माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सर्व सहकारी संस्था प्रगतीपथावर आहे. या संस्था यापुढेही अशाच पद्धतीने प्रगतीपथावर राहण्यासाठी सर्वानी सामुहिक प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले. यावेळी संस्थेच्या मालकीच्या मंगल कार्यालयातील नूतन भोजनगृहाचे त्यांच्या शुभहस्ते उदघाटन करण्यात आले. . सभेचे प्रास्तविक करतांना संस्थेचे चेअरमन बाळासाहेब आभाळे यांनी २०१७-१८ या आर्थिक वर्षात संस्थेला १९ कोटी ८५ लाख ४३५ रुपयांचा नफा झाला असून सभासदांना १० टक्के लाभांश देण्याचे जाहीर केले. यावेळी इयत्ता १० वी व १२ वी मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा व संस्थेची जास्तीत जास्त वसुली, जास्तीत जास्त ठेव,व्याज व जास्तीत जास्त लाभांश घेणारे सभासद नरेंद्र औताडे, जनार्दन पेंढारे, सतीश औटी,भाऊसाहेब औताडे, सुनील जोशी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी काळे कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप, जनरल मॅनेजर ए.व्ही.काळे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर जयंत भिडे, सेक्रेटरी सुनील कोल्हे, ऑफिस सुपरिटेंडेंट बाबा सय्यद, कामगार संचालक अरुण पानगव्हाणे कामगार पतपेढीचे व्हा. चेअरमन राजेंद्र गवळी, संचालक दिलीप वाके, अविनाश कोल्हे, नानासाहेब सिनगर,आण्णासाहेब काळे,बबनराव होन,बाबुराव खळे, कारभारी पावले, सौ. प्रिया वसंतराव काळे, कारखाना आदी मान्यवरांसह संस्थेचे सर्व कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मॅनेजर सयाजी देवढे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष राजेंद्र गवळी यांनी मानले.यावेळी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram