गावाच्या हितासाठी विकासकामे करतांना कठोरनिर्णय घ्या | तालुक्यात विकास नाही पण विकासाचे फ्लेक्स दिसतात - आशुतोष काळे

जिल्हा परिषद - पंचायत समितीमध्ये सत्ता मिळाल्यापासून सर्व सदस्य ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत. सर्व सदस्य सतत पाठपुरावा करून निधी मिळवत आहेत. या निधीचा विनियोग चांगल्या प्रकारे करून गावचा विकास करा. पाणीपुरवठा योजना तात्पुरती सुरू झाली आहे पण भविष्यात ही योजना सुरळीत सुरू ठेवायची असेल तर नळपट्टी वसूल करावीच लागेल. विकास कामे करत असतांना सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी स्वतः उभे राहून कामांचा दर्जा तपासला पाहिजे.गावाच्या हितासाठी विकासकामे करतांना कठोर निर्णय घ्या असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी मढी खु. येथे केले. चांदेकसारे गटाच्या जी.प.सदस्या सौ. सोनाली रोहमारे यांच्या निधीतून मढी खु. उंबरावती नदी पूल ते नासिक रोड (कुऱ्हाडे वस्ती) रस्त्याचे कामाचा भूमिपूजन समारंभ व जिल्हा परिषद शाळा खोल्यांच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ युवानेते आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, माजी आमदार अशोकराव काळे यांनी तालुक्यात कोट्यावधी रुपयांची विकासकामे केली. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या पुलांमुळे तालुक्यातील दळणवळणास चालना मिळाली मात्र तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी केलेली कामे दिसत नाहीत. फक्त मोठ्या रकमेचे फ्लेक्स मात्र आवर्जून दिसतात. आहे. यावेळी त्यांनी पेट्रोल-डिझेलचे वाढलेले भरमसाठ दरावरून सरकारवर टीकास्त्र सोडले.कार्यक्रमाचे प्रास्तविक करतांना सरपंच सौ.वैशाली आभाळे म्हणाल्या की, काळे परिवाराने आजवर मढी खु. गावाच्या सार्वजनिक विकास कामांसाठी बहुमोल सहकार्य केलेले आहे. काळे परिवाराचा वारसा युवा नेते आशुतोष काळे पुढे उत्तमरीत्या चालवीत असून मढी खु. गावाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी केलेले सहकार्य अनमोल आहे. या सहकार्यातून उतराई होण्यासाठी येणा-या विधानसभा निवडणुकीत युवा नेते आशुतोष काळे यांना आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी मढी खु. ग्रामस्थांच्या वतीने ग्वाही दिली.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब कु-हाडे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील शिंदे, जी.प. सदस्या सौ. सोनाली रोहमारे, सभापती सौ. अनुसया होन, श्रीधर आभाळे,मोहनराव आभाळे, सोपानराव गवळी, मा. जी.प.सदस्य उत्तमराव कु-हाडे, सोपानराव आभाळे, माधवराव आभाळे, नामदेवराव गवळी, दत्तात्रय आभाळे, राहुल रोहमारे, रोहिदास होन, देर्डेचे सरपंच योगीराज देशमुख, देवेन रोहमारे, नंदकिशोर औताडे, बाळासाहेब औताडे, बाळासाहेब आहेर, उपअभियंता यु.सी. पवार, शाखा अभियंता गावडे, विस्तार अधिकारी रानमाळ, उपसरपंच अमोल गवळी, सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच सौ.वैशाली आभाळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद आभाळे यांनी केले तर आभार उपसरपंच अमोल गवळी यांनी मानले. यावेळी इयत्ता ५ वीच्या परीक्षेत जि. प. शाळेच्या विद्यार्थिनी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आल्याबद्दल तसेच सोपानराव आभाळे यांना जी. प. चा प्रगतीशील शेतकरी पुरस्कार मिळाल्याबद्दल, कृष्णा गवळी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram