वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत आशुतोष काळेंनी केली महावितरणच्या अधिका-यांशी चर्चा

शेतकरी व वीज ग्राहकांना विजेचे बील भरूनही नियमितपणे वीजपुरवठा होत नाही. मागील दोन महिन्यापासून पाऊस तालुक्यातून गायब झाला आहे. शेतक-यांना पिक वाचवण्यासाठी विहिरीच्याच पाण्याचा आधार आहे परंतु शेती पंपाला मिळणारा वीज पुरवठा सुरळीत मिळत नाही. मिळाला तर अतिशय कमी दाबाने मिळतो त्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे विजेची मागणीही वाढली आहे. त्यामुळे शेतक-यांना व वीज ग्राहकांना सुरळीतपणे वीजपुरवठा करा अशा सुचना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी महावितरणच्या अधिका-यांसमवेत झालेल्या चर्चेदरम्यान महावितरणच्या अधिका-यांना दिल्या. या बैठकीत कोपरगाव शहर व तालुक्यातील ओव्हरलोड ट्रान्स्फार्मरचे प्रस्ताव पाठविले असून या प्रस्तावांची सद्यस्थिती काय आहेतसेच बंद असलेल्या डीपी ट्रान्स्फार्मरबद्दलची माहिती युवा नेते आशुतोष काळे यांनी यावेळी जाणून घेतली. ग्रामीण भागात १२८ ओव्हरलोड ट्रान्स्फार्मर असून १८ ट्रान्स्फार्मर बंद आहेत. यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत असून त्यावर त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.तसेच शहर व तालुक्यातील महावितरणच्या खांबावर झोळ पडलेल्या तारा तसेच वाकलेले खांब दुरुस्तीबाबत सुचना केल्या. तसेच कोणताही अपघात होऊ नये यासाठी योग्य काळजी व उपाययोजना करण्याच्याही सूचना त्यांनी महावितरणच्या अधिका-यांना करून कोकमठाण येथील रखडलेल्या सबस्टेशनचा व कोपरगाव शहर व तालुक्यातील सर्व सबस्टेशनचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता जितेंद्र महाजन, दिनेश छावडा उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram