भविष्यात प्री स्कूल सुरु करणार – आशुतोष काळे

माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी १९७१ साली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून सुसंस्कृत शिक्षण मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. परंतु भविष्यात परिसरातील पालकांची अडचण ओळखून अडीच वर्षापासूनच्या मुलांना हसत खेळत शिक्षण मिळावे व पालकांची शिक्षणाविषयीची चिंता दूर करण्यासाठी प्री स्कूल सुरु करण्याचा मनोदय संस्थेचे विश्वस्त युवा नेते आशुतोष काळे यांनी ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलतांना व्यक्त केला. कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीची ४७ वी वार्षिक सर्व साधारण सभा नुकतीच संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली गौतम पब्लिक स्कूलच्या ग्रंथालयात संपन्न झाली. सर्वप्रथम एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक स्व.शंकररावजी काळे साहेब व स्व.सौ.सुशीलामाई काळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. आयोजित सभेसाठी अध्यक्षपदाची सुचना गणपतराव चीताळकर यांनी मांडली सदर सूचनेस वसंतराव दंडवते यांनी अनुमोदन दिले. यावेळी बोलतांना युवा नेते आशुतोष काळे पुढे म्हणाले की, कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या संस्थेत शिक्षण घेत असलेला प्रत्येक विद्यार्थी सर्वच क्षेत्रात आज आघाडीवर आहे.व यापुढेही अष्टपैलू विद्यार्थी घडविण्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचे काम अविरतपणे सुरु आहे. आपल्या सर्वच शाळा महाविद्यालयातून दर्जेदार शिक्षण मिळत असून सर्वच संस्था प्रगतीपथावर आहे. शहरातील शाळा, महाविद्यालयांप्रमाणे आपल्या संस्थेच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना सोयी सुविधा पुरविल्या जातात. त्यामुळे सर्वच शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा ओघ दरवर्षी वाढतच असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थचे सभासद एम.टी.रोहमारे यांनी दिवंगत झालेले सभासद मान्यवर, हितचिंतक, कर्मचारी यांच्या श्रद्धांजलीचा ठराव मांडण्यात आला त्यानुसार सर्व उपस्थितांनी श्रद्धान्जली अर्पण केली. विषय पत्रिकेप्रमाणे सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी संस्थेचे व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड, सचिव सौ. चैतालीताई काळे, कारभारी जाधव, सिकंदर पटेल,भास्करराव आवारे, बाळासाहेब बाराहाते, अक्षय काळे, सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक व सभासद, मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेचे सूत्रसंचालन केशव दळवी यांनी केले तर आभार भास्करराव आवारे यांनी मानले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram