गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ४७ वी व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनीची १९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कर्मवीर शंकरराव काळे सभागृहात संस्थेचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेचे संस्थापक स्व.शंकररावजी काळे व स्व. सौ.सुशीलामाई काळे यांच्या प्रतिमांचे पूजन करून सभेची सुरुवात करण्यात आली. अहवाल सालात दिवंगत झालेल्या व्यक्तींना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी संस्थेच्या सभासदांना मार्गदर्शन करतांना सभेचे अध्यक्ष युवा नेते आशुतोष काळे म्हणाले की, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनी नेहमी सभासदांचे हित जोपासण्यासाठी प्रयत्नशील असते. त्या माध्यमातून ऊस वाहतुकदारांना ऊस वाहतूक दरामध्ये १५ टक्के वाढ देण्यात आलेली आहे. सभासदांचे मागणीनुसार व कंपनीच्या धोरणाप्रमाणे ट्रकधारकांना ट्रक्स दुरुस्तीसाठी आगाऊ रक्कम, स्पेअरपार्टस, टायर्स व डिझेल उधारीवर पुरवित आहे. दुर्दैवाने झालेल्या ट्रक्स अपघाताची व इतरही घटकांना नुकसान भरपाई त्या त्यावेळी संस्थेनी तातडीने मिळवून दिलेली आहे. कंपनीने मागील गळीत हंगामापासून लीडअप योजनेत भाग घेतल्यामुळे ट्रक धारकांना गळीत हंगाम बंद असतांना ट्रक्सचा वापर नसतांना भरावी लागणारी विम्याची रक्कम न भरताही पुढील कालावधीसाठी विमा सुरक्षा मिळणार असून ट्रक्सधारकांची जवळपास १२,०००/- ते १३,०००/- रुपयांची बचत कंपनीने केली असून भविष्यातही कंपनी सभासदांच्या हित जोपासण्यासाठी बांधील असल्याचे सांगितले. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सुनील शिंदे, जेष्ठ नेते छबुराव आव्हाड, संचालक अशोकराव तीरसे, आनंदराव चव्हाण, मीननाथ बारगळ, सर्जेराव कोकाटे, बाळासाहेब बारहाते, सुधाकर रोहोम, सचिन चांदगुडे, सचिन रोहमारे, हरिभाऊ शिंदे, अशोकमामा काळे,कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप, जनरल मॅनेजर ए. व्ही. काळे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर जयंत भिडे, सेक्रेटरी सुनील कोल्हे, ऑफिस सुपरिटेंडेंट बाबा सय्यद आदी मान्यवरांसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेचे प्रास्तविक संस्थेचे कार्यकारी संचालक वसंतराव आभाळे यांनी केले. सूत्रसंचालन जनरल मॅनेजर सोपानराव डांगे यांनी केले तर आभार विजयराव जाधव यांनी मानले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram