सुदृढ परिवारासाठी महिलांची भूमिका महत्वाची – सौ. चैतालीताई काळे

महिलांनी आपल्या कुटुंबातील मुलांना सकस आहार देवून आपल्याही आरोग्याकडे दुर्लक्ष न करता आपला परिवाराचे आरोग्य उत्तम कसे राहील याकडे लक्ष दिले पाहिजे. महिला सुदृढ राहिल्यास प्रत्येक परिवार सुदृढ राहतो त्यामुळे प्रत्येक परिवाराचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी महिलांची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ.चैतालीताई काळे यांनी केले. महिला बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास कार्यक्रम अंतर्गत पोषण आहार कार्यक्रम कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे सौ.चैतालीताई काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी उपस्थित असणा-या महिलांना सुदृढ राहण्यासाठी सकस आहाराबद्दल बहुमोल मार्गदर्शन करून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.लहान मुलांना देण्यात येणारा पोषण आहार यावेळी अंगणवाडीतील चिमुरड्यांना सौ. चैतालीताई काळे यांनी भरविला. या कार्यक्रमात गरोदर मातांचे ओटीभरण करण्यात आले तसेच आंगणवाडीतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. सांस्कृतिक कार्यक्रमातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी प्रभावित होऊन सौ.चैतालीताई काळे यांनी विद्यार्थ्यांना बक्षीस देवून त्यांचा आनंद द्विगुणीत केला. जिल्हा परिषद आंगणवाडीच्या विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट असा सांस्कृतिक कार्यक्रम पाहून जिल्हा परिषद आंगणवाडीचा दर्जा अतिशय चांगला आहे असे आवर्जून सांगितले. यावेळी पंचायत समिती सभापती सौ. अनुसयाताई होन, जी.प. सदस्या सौ. सोनालीताई रोहमारे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील शिंदे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब रहाणे, सरपंच रणधीर, के. डी. खालकर, बाबुराव थोरात, देवेन रोहमारे, कौसरभाई सय्यद, सुपरवायझर आढाव एस.के., खरे एस.आर., अंगणवाडी सेविका सौ.जयश्री देशमुख, सौ.प्रतिभा ठोंबरे, सौ.वनिता गांगुर्डे, सौ.जिजाबाई शेळके, सौ.सुनिता गोर्डे, सौ.शारदा देशमुख, सौ.अर्चना राहणे, मदतनीस तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram