नियमित आरोग्य तपासणी काळाची गरज –आशुतोष काळे

धकाधकीच्या व धावपळीच्या जीवनात व्यायामाचा अभाव, चुकीच्या आहार व विहार पद्धतीने आज प्रत्येकाचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या आजाराला बळी पडावे लागते. वेळच्या वेळी या आजारांच्या तपासण्या करून निदान केले गेले नाही तर त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी करणे काळाची गरज बनली आहे असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. माजी आमदार आदरणीय अशोकराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मवीर प्रतिष्ठान कोपरगाव व अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने श्री साई बाबा तपोभूमी कोपरगाव येथील महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट (प्रदर्शन हॉल) मध्ये मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, विविध आजारांचे निदान हे तपासणी केल्यानंतर योग्य उपचार होतात परंतु सर्वसामान्य कुटुंबातील रुग्ण आर्थिक अडचणीमुळे शक्यतो अशा तपासण्या करीत नाही त्यामुळे गरीब व गरजूंच्या आरोग्याची मोफत तपासणी होण्यासाठी अशी शिबीर घेणे आवश्‍यक आहे.या मोफत आरोग्य तपासणी शिबीराच्या माध्यमातून कर्मवीर प्रतिष्ठान आपल्या नावाला साजेसे सामाजिक काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी एकूण २८८ रुग्णांच्या मुत्र रोग, हृदय रोग, मेंदु विकार, पोटाचे विकार, स्रियांच्या विविध प्रकारच्या आजारांच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या. तसेच प्रत्येक हृदयरोग व मधुमेही रुंग्नांची मोफत रक्त तपासणी, शुगर, बी.पी., ए.सी.जी. तपासणी करण्यात आली. याप्रसंगी डॉ.गिरीश क्षत्रिय, अशोका मेडीकेअर हॉस्पिटल डॉ.प्रशांत पाटील डॉ. राकेश पाटील डॉ. तेजस सांकळे डॉ. प्रणिता सांगवी, डॉ. एजाज शेख अशोक खांबेकर, धरमशेठ बागरेचा, गोरक्षनाथ जामदार, राजेंद्र निकोले, डॉ.चन्द्रशेखर आव्हाड, डॉ. तुषार गलांडे, नगरसेवक वीरेन बोरावके, मंदार पहाडे, रमेश गवळी, फकिरमामा कुरेशी, कृष्णा आढाव, राहुल रोहमारे, सुनिल बोरा, प्रशांत वाबळे, संतोष चवंडके, निलेश उदावंत, मुकुंद भुतडा, अनुप कातकडे, गोरख पंडोरे, राहुल दिवाळीकर, दिनकर खरे, गणेश ललकारे, मुंजे साहेब, चंद्रकांत कौले, राकेश गवारे, समीर वर्पे, मतीन शेख, बापू वढणे, ऋषिकेश सांगळे, एकनाथ गंगुले, बाळासाहेब शिंदे, संदीप सावतडकर, विशाल निकम, चंद्रशेखर म्हस्के, शरद खरात, कर्मवीर प्रतिष्ठानचे डॉ. चंद्रशेखर आव्हाड,राजेंद्र आभाळे, राजेंद्र बोरावक, नितीन बनसोडे, सचिन बढे, मुकुंद इंगळे, प्रसाद उदावंत, प्रदीप कुहाडे, संजय बचाटे, किरण पवार, विलास ताम्हाणे, कुलदीप लवांडे, फिरोज पठाण, नारायण लांडगे आदी सदस्यांनी शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram