कर्मवीरांच्या प्रेरणेतून स्व.शंकररावजी काळे साहेबांनी रयतचा वटवृक्ष फुलविला –आशुतोष काळे

रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेसाठी कर्मवीर भाऊराव पाटलांना मोठा त्याग करावा लागला आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी त्यांना आपल्या पत्नीचे सौभाग्यलेणे अर्थात मंगळसूत्र गहाण ठेवले होते. त्यांचे अथक प्रयत्न व संघर्षातून श्रीमंतांची शिक्षणाची मक्तेदारी मोडीत निघून कष्टक-यांची, शेतक-यांची व बहुजनांची मुले रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेवू शकले.कर्मवीर आण्णांच्या प्रेरणेतून माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी प्रेरणा घेवून काम करण्याची दिलेल्या संधीतून रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष फुलविला असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे केले. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा १३१ वा जयंती सोहळा कार्यक्रम श्री.ग.र. औताडे पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेच्या इतिहासात कर्मवीर शंकररावजी काळे साहेब १९७५ ते १९९० या काळात रयत शिक्षण संस्थेची जबाबदारी सांभाळत असतांना विद्यार्थी संख्या १ लाखावरून ३ लाखावर नेली. १३ हजार ७५० शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांचा पसारा चालविण्यासाठी रयत शिक्षण संस्थेची वार्षिक बजेट ५ कोटी रुपयांचे होते. हेच बजेट साहेबांनी १९९० साली तब्बल ५० कोटीवर नेवून ठेवून रयत शिक्षण संस्थेला प्रगतीच्या शिखरावर नेवून ठेवले. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या जीवनावर कु. श्रुतिका औताडे, कु.श्रुती डोंगरे व साक्षी फटांगरे यांनी उत्कृष्ट भाषण केले त्यांचे युवा नेते आशुतोष काळे यांनी विशेष कौतुक करून विद्यार्थ्यांनी त्यांचे आदर्श घेवून वक्क्तृत्व कला आत्मसात करावी असे आवाहन केले. रयत शिक्षण संस्थेवर काम करतांना रयत शिक्षण संस्थेच्या शाळा-महाविद्यालयांना येणा-या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी प्रा. सौ. शीला गाढे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील व स्व. कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी रयत शिक्षण संस्थेसाठी केलेल्यापवित्र ज्ञानदानाच्या कार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन सुनील शिंदे, संचालक राजेंद्र घुमरे, सचिन रोहमारे, आनंदराव चव्हाण, उत्तमराव औताडे, एम. टी. रोहमारे, योगेश मच्छिंद्र औताडे, साईनाथ रोहमारे, अॅड. राहुल रोहमारे,निवृत्ती शिंदे, नंदकिशोर औताडे, जयंत रोहमारे, बाळासाहेब घुमरे, रोहिदास होन, दिलीप औताडे, सोपानराव आभाळे, साहेबराव राहणे, देर्डेचे सरपंच योगीराज देशमुख, मढीच्या सरपंच सौ. वैशाली आभाळे, सोनेवाडीचे सरपंच गंगाधर खोमणे, सचिन मुजगुले, भाऊसाहेब कु-हाडे, केशव जावळे, भाऊपाटील गुंजाळ,कमलाकर शिंदे, सिकंदर इनामदार,कौसर सय्यद, प्राचार्य कोकाटे आदी मान्यवरांसह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम. टी. रोहमारे यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती देव्हारे यांनी केले तर आभार व्ही.व्ही. शिंदे यांनी मानले. फोटो ओळ- श्री.ग.र. औताडे पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पोहेगाव येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३१ व्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलतांना युवा नेते आशुतोष काळे.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram