जे बोललो ते करून दाखविले – आशुतोष काळे

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण होत असल्याचे मोठे समाधान मिळत असून निवडणुकीपूर्वी जे बोललो ते करून दाखविले असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील करंजी येथे विविध विकासकामांच्या उदघाटन कार्यक्रम प्रसंगी बोलतांना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या सौ. विमलताई आगवण होत्या. ब्राम्हणगाव गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. विमलताई आगवण यांच्या विकास निधीतून जिल्हा नियोजन अंतर्गत करंजी जिल्हा परिषद शाळा खोली भूमिपूजन, स्मशानभूमि मध्ये पेवर ब्लॉक बसविणेच्या कामाचा तसेच ओगदी येथील जिल्हा परिषद नूतन शाळा खोलीच्या कामाचा शुभारंभ युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये आघाडीची सत्ता असल्यामुळे विकासाच्या बाबतीत ग्रामीण भागात एकाच वर्षात मोठा बदल घडून आला आहे. सर्व जिल्हापरिषद सदस्य व पंचायत समिती सभापती, उपसभापति व त्यांचे सहकारी सदस्य मोठ्या प्रमाणात निधी मिळवीत आहे. जिल्हा नियोजन समितीवर अहमदनगर जिल्हा परिषदेच्या एकून १३ तालुक्यातून निवडण्यात आलेल्या ३२ सदस्यांपैकी तब्बल चार सदस्य हे एकट्या कोपरगाव तालुक्यातील असल्यामुळे विकास कामांना वेग आला असून यापुढेही कोपरगाव तालुक्याच्या विकासकामांमध्ये सातत्य ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पंचायत समितीच्या सभापती सौ. अनुसया होन, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, उपसभापती अनिल कदम, कारभारी आगवण, शिक्षणाधिकारी शबाना शेख, बांधकाम विभागाचे क्षीरसागर, नाना आगवण, सांडूभाई पठान, रोहिदास होण, कारखान्याचे संचालक संजय आगवण, गौतम बँकेचे संचालक अनिल महाले,सरपंच छबू आहेर, ग्रामसेवक गुंड, आबा शिंदे, नाथा आगवण, भास्कर शहाणे, दत्तू बोठे, नवनाथ आगवण, केशवराव चरमळ, मुकुंद आगवण, गोपाल कुलकर्णी, ओगदीच्या सरपंच कल्पना सावंत, श्रीमती विद्या भोईर,भागवत जोरवर, बाळनाथ जोरवर, संदीप सावंत,पोलीस पाटील अनिल चरमळ, सुरेश जोरवर, गणेश गोणटे, सोमनाथ जोरवर, बाळासाहेब भागवत, देवचंद सोनवणे, भास्कर गोणटे आदी मान्यवरांसह ओगदी व करंजीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram