दुष्काळी तालुक्याच्या यादीत कोपरगाव तालुका नाही कोपरगाव तालुक्याच्या जनतेवर लोकप्रतिनिधींकडून मोठा अन्याय - आशुतोष काळे

शासनाने नुकतेच राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील तालुक्यांचे नावे जाहीर केली असून यामध्ये कोपरगाव तालुक्याच्या सीमेवर असणा-या सिन्नर, वैजापूर, राहाता आदी तालुक्यांचा सामावेश असून कोपरगाव तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असूनही कोपरगाव तालुक्याचे नाव दुष्काळी तालुक्याच्या यादीतून वगळलेले आहे. हे कोपरगाव तालुक्याच्या निष्क्रिय आमदारांचे मोठे अपयश असून कोपरगाव तालुक्याच्या जनतेवर कोपरगाव तालुक्याच्या आमदारांनी मोठा अन्याय केला असल्याचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी म्हटले आहे. कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे येथे विविध विकास कामांच्या उदघाटन व भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षक भिंत व कमानीचे उदघाटन तसेच जनसुविधा योजने अंतर्गत तळेगाव मळे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन तसेच तळेगाव मळे ते खोपडी या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ युवा नेते आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्यातील काही भाग सोडला तर इतर ठिकाणी भयानक दुष्काळी परिस्थिती आहे. कमी पावसामुळे खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे. जानेवारीतच पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला तालुक्याला सामोरे जावे लागणार आहे.खरीप हंगाम गेला रब्बीच्या पेरण्या करायला शेतकरी धजावणार नाही. अशा कठीण परिस्थितीत कोपरगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर होणे अपेक्षित असतांना कोपरगाव तालुक्याचे नावच दुष्काळी तालुक्यात नाही हे कोपरगाव तालुक्याच्या जनतेचे दुर्देव आहे.त्याबाबत आपण सोमवारी तहसीलदारांची भेट घेवून पुढील दिशा ठरवनार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राजेश परजणे यांनीही आपल्या भाषणातून कोपरगाव तालुक्याला दुष्काळी तालुक्यातून वगळल्याबद्दल सरकारचा निषेध करीत भाजप सरकार च्या चुकीच्या धोरणामुळे नागरिकांचे अच्छे दिन गेले असून बुरे दिन आले असल्याची टीका केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी.प.सदस्य राजेश परजणे होते. याप्रसंगी सभापती अनुसयाताई होन,उपसभापति अनिल कदम,जी.प. सदस्य सौ. सोनालीताई साबळे, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, काळे कारखान्याचे संचालक बाळासाहेब बारहाते, अॅड. आर टी भवर,राष्ट्रवादीचे युवक तालुका अध्यक्ष चारुदत्त सिनगर, सरपंच सचिन क्षीरसागर, उपसरपंच आशाताई टूपके, रोहिदास होन, दादा टूपके, प्रसाद साबळे, ह.भ.प. शंकर महाराज गाडीवान,दत्तात्रय देवकर नितीन भवर, उपअभियंता पवार यु.सी. , रानमाळ डी. ओ., शाखा अभियंता शिंदे, ग्रामविकास अधिकारी राठोड पी.आर.तसेच खोपडी, धोत्रे, गोधेगाव, घोयेगाव आदी गावातील कार्यकर्ते व तळेगाव मळेचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजाहारी टूपके यांनी केले तर आभार साहेबराव शिंदे यांनी मानले.

Latest News

Useful Links

महाराष्ट्र राज्य समाजकल्याण स्कॉलरशिप ऑनलाईन नोंदणी
https://mahaescholmaharashtragov.in
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांच्या माहितीसाठी
https://www.maharashtra.gov.in/1126/1177
ऑनलाईन ग्राहक तक्रार निवारण केंद्र
https://www.complaintboard.in
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय
http://ahmednagar.nic.in
महाराष्ट्र शासनाचे सर्व शासननिर्णय (जी. आर.) मिळवण्यासाठी
https://www.maharashtra.gov.in/Site/Common/governmentResolutions.aspx

Facebook

Instagram